Palm Scan Payment Video Viral: मॉल किंवा इतर कुठेही शॉपिंगसाठी जातो तेव्हा घराबाहेर पडण्याआधी आपण खिशात पॉकेट आहे का ते तपासून खात्री करून घेतो. एटीएम कार्ड, कॅशशिवाय आपण कुठे बाहेर पडत नाही; पण हल्ली अनेक जण मोबाईलवरील क्यूआरच्या मदतीने पेमेंट करतात. त्यामुळे आता खिशात पॉकेट ठेवण्याची गरज भासत नाही. पण, आता त्याही पुढे जाऊन तुम्हाला एटीएम कार्ड, कॅश, क्यूआर कोडचीही गरज भासणार नाही. कारण- आता अशी एक पेमेंट मशीन व्हायरल होत आहे, ज्यात तुम्ही हात दाखवताच पेमेंट होत आहे. म्हणजे तुम्ही शॉपिंग करून पेमेंटसाठी थांबाल तेव्हा झालेलं बिल तुम्ही केवळ हात दाखवून भरू शकता. तुम्हाला हे वाचून नवलं वाटेल; पण अशी मशीन भविष्यात भारतात आली, तर नवल वाटायला नको. सध्या या अनोख्या पेमेंट मशीनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इतर कोणत्या दुसऱ्या-तिसऱ्या देशातील नाही, तर चीनमधील आहे. तिथले लोक कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी रोख रक्कम किंवा कार्ड वापरत नाहीत. तिथे ऑनलाइन पेमेंट सोडा, पण फक्त हात दाखवून लोक पेमेंट करतात.

emotional quote viral video rickshaw driver write heart touching best line for father
VIDEO : रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं लिहिलं असं काही की, पाहून अनेकांना झाली वडिलांच्या कष्टाची जाणीव; लोक म्हणाले, “लाखात एक…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
Crime News
Crime News : क्रौर्याचा कळस! सुनेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सासऱ्यांनी मिरची पावडर टाकली, सासूने दिले रॉडचे चटके; कुठे घडली घटना?
Image of Rahul Gandhi and Arvind Kejriwal
Markadwadi : उद्धव ठाकरे, राहुल गांधी, केजरीवाल मारकडवाडीला देणार भेट, शरद पवार यांच्या आमदाराने सांगितली तारीख
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 : कमला हॅरीस यांचा पराभव, रात्रीचं भाषणही रद्द!

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात चीन आधीच २०५० च्या युगात गेला असल्याचे दाखवण्यात आले आहे. तिथले लोक खिशात पैसे किंवा पाकीट घेऊन जात नाहीत. कोणाला काही विकत घ्यायचे असेल आणि त्या बदल्यात पैसे द्यायचे असतील, तर फक्त हात दाखवला की, पेमेंट होऊन जातं.

चीनमधील दुकाने आणि शॉपिंग मार्ट्समध्ये कार्ड स्वाइप करून किंवा क्यूआर कोड वापरून पेमेंट करणं ही जुनी पद्धत झाली आहे. इथे लोक त्यांच्या मनाप्रमाणे खरेदी करतात आणि नंतर पेमेंटच्या वेळी त्यांना फक्त काउंटरवर हात दाखवावा लागतो आणि पेमेंट केले जाते.

हाताने केले जाते पेमेंट

ना तिकिटाची गरज, ना टीटीचं टेन्शन; भारतात ‘या’ ट्रेनने तुम्ही करु शकता फुकट प्रवास, जाणून घ्या Route

हा व्हिडीओ @ranahamzasaif नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती सांगते की, तुम्हाला दुकानात फक्त तुमचा हात स्कॅन करायचा आहे. त्यानंतर तुमच्या बँकेशी संबंधित तपशील त्यांच्या सिस्टीममध्ये फीड केला जाईल. त्यानंतर भविष्यात जेव्हा कधी तुम्हाला त्या दुकानात खरेदी करायची असेल, तेव्हा तुम्ही कोणत्याही कार्ड किंवा QR कोडशिवाय तुमचा हात स्कॅन करून पेमेंट करू शकता. तुम्ही चीनमधील त्या स्टोअरच्या कोणत्याही आउटलेटमध्ये अशा प्रकारे पेमेंट करू शकता.

Story img Loader