मुलींवर छाप पाडण्यासाठी मुले काय काय करतील याचा नेम नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ असाच काहीसा आहे. प्राणी संग्रहालयात आलेल्या सुंदर तरुणींवर छाप पाडण्यासाठी एक तरुण चक्क झोपलेल्या पांडाच्या पिंज-यात शिरला इतकेच नाही तर त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. पांडाने देखील आपल्याला त्रास देणा-या तरूणाची चांगलीच खोड मोडली, त्यामुळे पाड्यांच्या या मगरमिठीतून जीव सोडवून घेताना या तरुणाच्या नाकीनऊ आले.
चीनच्या सीसीटीव्ही न्यूजने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ टाकला आणि अल्पावधितच तो व्हायरल झाला. चीनच्या एका प्राणी संग्रहालयातला हा व्हिडिओ आहे. या प्राणी संग्रहालयात दोन तरुणींसोबत आलेल्या एका तरूणांने मुलींवर आपली छाप पाडण्यासाठी पांडाच्या पिंज-यात उडी मारली. दीड मीटरचे कुंपण ओलांडून त्याने पिंज-यात प्रवेश केला. पण इतकेच नाही तर त्यांनी झोपलेल्या पांडाला उठवण्याचा प्रयत्नही केला. त्यामुळे रागात या पांडाने तरूणाचा पाय घट्ट धरून ठेवला. या तरुणाने आपला पाय सोडवण्याचा प्रयत्न केला पण या प्राण्यापुढे त्याचे काहीच चालेना. शेवटी मदतीसाठी इतर कर्मचारी धावून आले आणि त्याने याला सुरक्षित बाहेर काढले. या पांडाला तरुणासोबत खेळायचे होते म्हणून त्याने याचे पाय धरून ठेवल्याचे कर्मचा-यांनी सांगितले जर पांडाने त्यावर हल्ला केला असता तर मात्र त्याचे वाचणे मुश्किल झाले असते असेही ते म्हणाले.
They're normally cute but this giant #panda was annoyed by this man's untimely intrusion and wake-up tease pic.twitter.com/cwGF0BSbN1
— CGTN (@CGTNOfficial) October 30, 2016