Panda Viral Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्राण्यांच्या या व्हिडीओंना सोशल मीडियावर सर्वाधिक पसंती दिली जाते. अनेकदा प्राण्यांचे हे व्हिडीओ इतके मजेशीर आणि गोंडस असतात की, ते पाहून हसू आवरता येत नाही. सध्या अशाच एका क्यूट पांडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल.

लहान बाळाप्रमाणे खेळणारा, मजा करणारा पांडा

पांडा हा अत्यंत मोहक आणि गोंडस प्राणी आहे. त्याच्या मोहक अंदाजाचे व्हिडीओ सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. त्याची प्रत्येक हालचाल सुंदर अन् क्यूट वाटते. सध्या अशाच एका लहान बाळाप्रमाणे खेळणाऱ्या, मजा करणाऱ्या पांडाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ तुम्ही एकदा पाहिलाच पाहिजे.

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, दोन क्यूट पांडा अंघोळीसाठी तलावाजवळ बसलेले दिसत आहेत. यावेळी प्राणिसंग्रहालयातील रक्षक त्यांची काळजी घेताना दिसतायत. एक छोटा पांडा अंघोळ करून तलावातून बाहेर पडतो, त्याची रक्षक अंग सुकवण्यासाठी त्याला पुढे घेऊन जाते. त्यानंतर दुसरी एक रक्षक मोठ्या पांडाला लहान मुलांना जसं जबरदस्तीने अंघोळीसाठी घेऊन जावं लागतं, अगदी तसंच त्याला उचलून घेऊन जाताना दिसतेय; पण तो पांडा मात्र अंघोळीस येण्यास तयार नसतो. ती त्याला उचलून खाली तलावाजवळ घेऊन जाणारच असते तितक्यात तो पळून जाण्याचा प्रयत्न करतो. पांडाचं हे अगदी लहान मुलासारखं अल्लड वागणं पाहून तुम्हालाही हसू येईल. त्याचा गोंडसपणा खरोखरच मनाला भिडणारा आहे.

सोशल मीडियावर क्यूट पांडाचा हा व्हिडीओ @AMAZlNGNATURE नावाच्या अकाउंटवरून व्हायरल झालाय. त्यावर अनेकांनी कमेंट्सद्वारे आपापल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. व्हिडीओवर बहुतेकांनी पांडाविषयी प्रेम व्यक्त केलं आहे; तर अनेकांनी हार्ट इमोजीसह प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओचं ठिकाण माहीत नाही; पण पांडाचा गोंडसपणा अनेकांची मनं जिंकून घेत आहे.