पांडा हा असा मोहक प्राणी आहे, जो त्याच्या गोंडसपणाने सर्वांनाच मोहून घेतो. सोशल मीडियावरील पांडाचे वेगवेगळे व्हिडीओ आणि मीम्स सतत कुणी ना कुणी शेअर करत असतं. सोशल मीडियावर पांडाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुमचं सुद्धा मन काही सेकंदात वितळेल. गवतामध्ये लोळण्यापासून ते आजूबाजूला आळस करण्यापर्यंत जे काही पांडा या व्हिडीओमध्ये करतोय ते पाहून तुम्ही सर्व राग रुसवे बाजुला ठेवाल. पांडा आंघोळी करतानाचा हा व्हिडीओ नेटिझन्सना खूपच आवडलाय. अगदी एखाद्या लहान बाळाप्रमाणेच हा पांडा पाण्यात खेळत खेळत मजा घेताना दिसून येतोय. हा व्हिडीओ तुम्ही एकदा पाहिलाच पाहिजे.
या व्हिडीओमध्ये पांडा आरामात एका छोट्या गोल तलावात बसलेला दिसून येतोय. पांडासाठी ही आंघोळीची वेळ होती, पाण्यात अगदी लोळत खेळायच्या मूडमध्ये हा पांडा दिसून येतोय. लहान मुलांसारखंच तो पाण्यात फटके मारताना दिसून येतोय आणि तो त्याच्या आंघोळीचा हा मजेशीर क्षण एन्जॉय करताना दिसून येतोय. पांडाला आंघोळीसारखी नेहमीची गोष्ट करण्यात खूप मजा येतेय. हे पाहून प्रत्येकाचंच मन मोहून जाईल.
हा पांडा सध्या सोशल मीडियावरील सेलिब्रिटीच बनला आहे. या गोंडस पांडाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल. या पांडाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकालाच त्यांनी त्यांच्या लहानपणी अंघोळ करतानाचे असे मजेदार किस्से आठवू लागतात.
हा व्हिडीओ युअर नेचर ग्राम नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या अकाउंटवरून नेहमीच प्रवास, निसर्ग आणि साहस याविषयीचे वेगवेगळे व्हिडीओ आणि पोस्ट शेअर केले जातात. गोंडस पांडाच्या या व्हिडीओला आतापर्यंत १.९ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. तसंच व्हिडीओमधील पांडाची मस्ती पाहून नेटिझन्स सुद्धा वेगवेगळे कमेंट्स देताना दिसून येत आहेत.
“अरे बापरे, तो खूप गोड आहे,” अशी कमेंट्स एका युजरने केली आहे. तर आणखी दुसऱ्या युजरने कमेंट करत ‘अगदी लहान मुलासारखे.’ असं म्हटलंय.