देशभरात सध्या नवरात्रोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. यावेळी अनेक भक्त माँ दुर्गा मातेच्या भक्तीत तल्ली होत तिची मनोभावे पूजा- अर्चा करत आहेत. अशी अनेक मंदिरं आहेत जिथे देवीची होणारी आरती खूप प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की आरतीच्या वेळी देव स्वत: त्या ठिकाणी येतो. त्यामुळे कोणत्याही पूजेनंतरच्या आरतीला खूप महत्व असते. यात हर की पौरी असो किंवा बनारसा घाट असो, इथे आरतीचा मनमोहक नजारा पाहायला मिळतो. सोशल मीडियावरही तुम्ही याठिकाणी होत असलेल्या आरतीचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. हे दृश्य पाहिल्यानंतर साक्षात देवचं आपल्याजवळ आलेत असा भास होतो. मन श्रद्धा आणि भक्तीने भरून येते. पण आज आम्ही तुम्हाला आरतीचा असा व्हिडीओ दाखवणार आहोत जो पाहिल्यानंतर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. यात पंडितजींनी इतकी खतरनाक आरती केली की त्यामुळे चार जणांच्या कपड्यांनाच आग लागली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर शेअर केलेला या खतरनाक आरतीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये पंडितजी मोठ्या आरतीचे ताट सजवून देवीची आरती करत होते. पण त्यांची आरती करण्याची स्टाईल बाकीच्या लोकांसाठी धोकादायक ठरली. पंडितजींच्या आरतीच्या ताटातून मागे उभ्या असलेल्या लोकांच्या कपड्यांना आग लागली. यावेळी पंडितजींच्या हातातील आरतीचे ताट सांभळण्यासाठी अनेक लोक पुढे आले. पण त्यांनी ताट न सोडता आपल्याच तालात आरती करत राहिले.

आरती करण्यात पंडितजी इतके मग्न झाले की त्यांना आजूबाजूला काय होत आहे याचीही त्यांना कल्पना नव्हती. यामुळे ते आरतीचे ताट जोरजोरात फिरवत राहिले. एक वेळ अशी आली की, आरतीच्या ताटातून निघत असलेल्या आगीमुळे मागे उभ्या असलेल्या लोकांचे कपडे जळाले. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, आरती अशा प्रकारे करावी की चार जण भाजतील. हा मजेदार व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. ही आरती कुठे केली जात आहे, याची माहिती व्हिडिओमध्ये देण्यात आलेली नाही. पण या पंडितजींची कृती पाहून लोकांनी मात्र आश्चर्य व्यक्त केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panditji viral aarti video will leave you shocked burnt people clothes sjr