Viral Video : पाणी पुरी हा प्रत्येकाच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. पाणी पुरी हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. पाणी पुरी हा असा पदार्थ आहे जो क्वचितच कोणाला आवडत नसावा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना पाणी पुरी आवडते. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी कुटुंबाबरोबर किंवा मित्र जमले तर आवडीने पाणी पुरीचा बेत आखला जातो. तुम्हाला पाणी पुरी आवडते का? जर हो तर हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही पाणी पुरी खावीशी वाटेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये काही तरुण मुले मुली पंगतीप्रमाणे पाणी पुरीचा आस्वाद घेताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही तुम्हीही थक्क व्हाल.सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (pani puri party video youngsters enjoying pani puri)
हा व्हिडीओ एका घरातील आहे. व्हिडीओमध्ये तरुण मुले मुली पंगती बसतात तसे बसले आहे आणि पाणीपुरीचा आस्वाद घेत आहे. प्रत्येकासमोर पुरी, बटाट्याचे मिश्रण, आणि पाणीपुरीचे पाणी आहे. प्रत्येक जण पाणी पुरी खाण्यात मग्न आहे आणि मनसोक्तपणे पाणीपुरीचा आनंद घेताना दिसत आहे. कदाचित हे तरुण मंडळी मित्र असावेत किंवा भावंड असावेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही अशीच पाणी पुरीची मेजवानी करावीशी वाटू शकते.
मित्र मैत्रीणी किंवा भावंडं एकत्र आल्यानंतर अनेक प्रकारच्या मेजवाणी आखली जाते पण अशी मेजवाणी फक्त पाणी पुरी प्रेमीच आखू शकतात. या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “माझ्या टाइपनुसार फॅन्सी रेस्टॉरंट” या पाणीपुरी प्रेमींचा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावरील अनेक युजर्सना सुद्धा आवडला आहे.
हेही वाचा : VIDEO : डिझेल पराठा कधी खाल्ला का? सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी केली जोरदार टिका, शेवटी मालकाने सांगितले…
पाहा व्हायरल व्हिडीओ
ritu_kishan_sangani या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “घरी बनवलेली पाणी पुरी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पाणी पुरी सर्वांबरोबर खाताना मजा येते. आणखी एका युजरने मिश्किलपणे लिहिलेय, “आता तुम्ही पाणी पुरीचा गाडा लावण्यास तयार आहात.” एक युजर लिहितो, “असं वाटतं पाणी पुरीची स्पर्धा आहे” हा व्हिडीओ लाखो लोकांनी बघितला असून हजारो लोकांनी शेअर केला आहे.