Pani puri seller gets GST notice : पाणीपुरी कोणाला आवडत नाही? क्वचितच असा व्यक्ती असेल ज्याला पाणी पुरी खायला आवडत नाही. लोकांना पाणीपुरी इतकी आवडते की कधीही, केव्हाही आणि कुठेही पाणीपुरी खायला हे लोक तयार असतात. छोटासा स्टॉल लावून पाणीपुरी विकणारे हे विक्रेतेही लाखो रुपये कमावतात हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. नुकतीच तामिळनाडूतील एका पाणीपुरी विक्रेत्याला वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) नोटीस पाठवली आहे ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल फोटो पाहून नेटकऱ्यांना भलतचा आनंद झाला आहे.,फोटो पाहून काहींना त्यांच्या करिअर बदल्याण्याची वेळ आली आहे का असा प्रश्न पडला आहे.(Pani puri seller gets GST notice for receiving ₹40 lakh in online payments)
२०२३-२४ मध्ये ₹४० लाख ऑनलाइन पेमेंट मिळाल्याबद्दल या पाणीपुरी विक्रेत्याला नोटीस पाठवण्यात आली आहे ज्याचा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे.
तामिळनाडू वस्तू आणि सेवा कर कायदा आणि केंद्रीय GST कायद्याच्या कलम ७० च्या तरतुदींनुसार जारी करण्यात आलेल्या १७ डिसेंब २०२४ रोजीच्या समन्सनुसार, पाणीपुरी विक्रेत्याला प्रत्यक्ष हजर राहून कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे.
“RazorPay आणि Phonepe कडून प्राप्त झालेल्या अहवालांच्या आधारे, तुम्हाला वस्तू/सेवांच्या बाह्य पुरवठ्यासाठी UPI पेमेंट प्राप्त झाले आहेत आणि २०२१-२२, २०२२२३ आणि २०२३-२४ या वर्षांसाठी मिळालेली देयके खाली दिली आहेत,”
समन्समध्ये २०२३-२४मध्ये मिळालेले ₹४० लाख मिळाल्याचे दाखवले आहे.
हेही वाचा – “मॅम, मला हात लावू नका”, दारूच्या नशेत महिलेने कॅब चालकाला मारले, आरडा ओरडा करत केला तमाशा, Viral Video
थ्रेशोल्ड मर्यादा ओलांडल्यानंतरही जीएसटी नोंदणी न घेता वस्तू/सेवांचा पुरवठा करणे हा गुन्हा आहे, असेही नोटिसीमध्ये म्हटले आहे.
अनेक सोशल मीडिया युजर्सनी नोटीसवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
“₹४०लाख ही त्याला मिळालेली रक्कम आहे आणि ती त्याची मिळकत असू शकते किंवा नाही. तुम्हाला भांडवलाचा खर्च, मनुष्यबळ याचा निश्चित खर्च इत्यादी वजा करावे लागतील. तो त्याच्या मूलभूत गरजा आणि खर्च भागवण्यासाठी पुरेसे पैसे कमवत आहे, परंतु त्यापेक्षा जास्त नाही,” असे एका एक्स वापरकर्त्याने सांगितले.
हेही वाचा –बाळाला स्तनपान करताना बीअर पित आहे आई! फोटो होतोय Viral, नेटकऱ्यांमध्ये पेटला वाद
मानसोपचार विभागाचे प्राध्यापक डॉ धीरज के म्हणाले की, “ही रक्कम अनेक वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या पगारापेक्षा जास्त आहे, ज्यांना स्लॅबवर कर आकारला जातो.”
“पाणीपुरी विक्रेता त्यांच्या बिलात जीएसटी जोडू शकतो आणि सरकारला पैसे देऊ शकतो. मात्र ज्याचे बिल कमी असेल त्या स्पर्धेत तो पराभूत होईल. आयकर विभागाची ही कारवाई लोकांना रोखीने व्यवहार करण्यास भाग पाडेल!!!”
“त्याने GST अंतर्गत स्वतःची नोंदणी करणे चांगले आहे,” असे आणखी एक Reddit वापरकर्ता म्हणाला.
हेही वाचा –वर्ष २०२४मध्ये बाबा वेंगाच्या ५ भविष्यवाण्या ठरल्या खऱ्या! २०२५मध्ये जगासमोर कोणते संकट येणार?
वापरकर्त्यांपैकी एकाने जीएसटीला “पाणीपरी शेवपुरी कर” म्हटले आहे.
Reddit वापरकर्त्यांपैकी एकाने याला एक चांगले पाऊल म्हटले आणि म्हटले, “हे सर्व व्यवसाय मालकांसाठी केले पाहिजे जे कर भरत नाहीत आणि खूप कमावतात. आम्ही करदात्यांना त्यांच्यामुळे अधिक कर भरावा लागतो.”
पण, काही वापरकर्त्यांनी नोटीसवर संशय देखील व्यक्त केला. “होय, पाणीपुरी विकून एवढी कमाई करणे शक्य आहे. पण हे बनावट, सहज फोटोशॉप केलेले दिसते,” असे एका वापरकर्त्याने सांगितले.