Leopard Attack: सध्या सोशल मीडियावर एका बिबट्याच्या बचाव मोहिमेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल (viral video) झाला आहे. हरियाणातील (Haryana Panipat) पानिपतमधील हा व्हिडीओ आहे. बेहरामपूर गावात बिबट्याला पकडण्याच्या मोहिमेदरम्यान एक पोलीस कर्मचारी आणि वन विभागाचे दोन अधिकारी यात जखमी झाले. या बिबट्याला नंतर यशस्वीपणे शांत करण्यात आले.
बचाव पथक शनिवारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोहीम राबवत असताना ही घटना घडली. बिबट्या दिसल्याच्या गावकऱ्यांच्या माहितीवर टीम कारवाई करत होती. बिबट्यासोबत झालेल्या चकमकीत टीमचे नेतृत्व करणारे स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) आणि वन विभागाचे दोन अधिकारी जखमी झाले.
बिबट्याला शांत करण्यात यश
पानिपतच्या पोलीस अधीक्षकांनी या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्यांच्या शौर्याला आणि धैर्याला सलाम करत व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. पानिपतचे एसपी शशांक कुमार सावन म्हणाले, “पोलीस आणि वन विभागाच्या लोकांसाठी कठीण दिवस. अनेक जण जखमी झाले. त्यांच्या शौर्याला आणि हिमतीला सलाम. सरतेशेवटी, सर्व सुरक्षित आहेत. अगदी बिबट्याही .”
(हे ही वाचा: …अन् बुट काढून सलमान खानने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला केलं अभिवादन; महाराष्ट्रभरात Video चर्चेत)
(हे ही वाचा: Silver Bus! एकाच खासगी बसमधून तीन दिवसात दोन वेळा पकडली २६ क्विंटल चांदी)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
आत्तापर्यंत ५८६ हजार लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे.अनेक हजार लोकांनी हा व्हिडीओ रीट्वीट केला आहे. तसेच यावर अएक कमेंट्सही आल्या आहेत. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या शौर्याचे कौतुक केले आहे. एका यूजरने कमेंट केली की, ‘पोलिस कर्मचाऱ्याचे काम किती धोकादायक आहे, हे या व्हिडीओवरून स्पष्ट होते.’