मध्य प्रदेशमधील एका पाणीपुरीवाल्याने त्याच्या घरात मुलीचा जन्म झाला म्हणून, तब्बल चार हजार लोकांना मोफत पाणीपुरी खाऊ घातल्या आहेत. मुलीचा जन्म झाला म्हणून मोफत पाणीपुऱ्या खाऊ घालणाऱ्या पाणीपुरीवाल्याचं नागरिकांनी तोंडभरुन कौतुक केलं आहे. तर सोशल मीडियावर देखील त्याच्या या कृतीची जोरदार चर्चा सुरु आहे.
संजीत चंद्रवंशी असं या पाणीपुरीवाल्याचं नाव आहे. संजीतचा मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील पोळा मैदानाजवळ पाणीपुरीचा गाडा आहे. आपल्या गाड्यावर तो दररोज जवळपास २ हजारावर पाणीपुरी विकतो. रहदारी मार्गावर असणाऱ्या त्याच्या गाड्यावर नेहमी गर्दी असते. मात्र, त्याने रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांना एक सुखद धक्का दिला.
आणखी पाहा- चिमुकलीच्या भजनाने जिंकली नेटकऱ्यांची मनं; निरागस भक्ती दाखवणारा Viral Video एकदा पाहाच
तो म्हणजे, पाणीपुरीच्या गाड्यावर रोज पैसे देऊन पाणीपुरी खाणाऱ्या खवय्यांना त्याच्या गाड्यावर मोठ्या अक्षरात ‘पाणीपुरी फ्रि’चा बोर्ड लागल्याचं दिसलं आणि तो येईल त्या प्रत्येकाला मोफत पाणीपुरी देऊ लागला. त्याला मोफत पाणीपुरी देण्यामागचं कारण विचारलं असता त्याने, मला मुलगी झाल्याच्या आनंदात मोफत पाणीपुरी देत असल्याचं सांगितलं.
दहा वर्षांनंतर घरात मुलीचा जन्म –
आणखी वाचा- मुकेश अंबानी म्हणतात 4G-5G पेक्षाही महत्वाचा आहे ‘हा’ G; मस्करीत दिला मोठा धडा
संजीत चंद्रवंशी यांना आणखी दोन भाऊ असून मागील १० वर्षांपासून त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला नव्हता. त्यामुळे दहा वर्षांनंतर माझ्या पत्नीने मुलीला जन्म दिल्यामुळे मला खूप आनंद झाला आणि त्या आनंदातच आपण लोकांना मोफत पाणीपुरी खाऊ घातल्याचं संजीतने सांगितलं. दरम्यान, आजकाल काहीजण मुलीला ओझं मानतात, संजीत यांनी मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा केला ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या या कृतीमुळे लोकांच्या मनात मुलीबद्दल आदर वाढेल, असं मतं पाणीपुरीच्या गाड्यावर आलेल्या एका मुलीने व्यक्त केलं.