Viral Video : सध्या सगळीकडे लग्नसराई सुरू आहे सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत लग्नातील डान्स, गाणी, परंपरा, प्रथा, उखाणे इत्यादी गोष्टींचे व्हिडीओ चांगलेच चर्चेत येत आहे लग्नात नातेवाईकांना किंवा कुटुंबातील लोकांना डान्स करताना तुम्ही अनेकदा पाहिले असेल. अशात नवरी नवरदेव स्वतःच्याच लग्नात डान्स करताना खूप कमी पाहायला मिळतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये नवरी डान्स करताना दिसते विशेष म्हणजे ही नवरी पंजाबी असून ती मराठी गाण्यावर डान्स करते. तिचा सुंदर डान्स पाहून तुमचीही नजर हटणार नाही. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
हे व्हायरल व्हिडिओमध्ये पंजाबी नवरीची मंडपात एन्ट्री दाखवली आहे आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल ही नवरी निळा आकाशी साडी मध्ये खूप सुंदर दिसत आहे ती डोक्यावर बाशिंग बांधली आहे आणि नाकात नथ घातली आणि गळ्यात मराठमोळे दागिने घातले आणि मराठी गाण्यावर ती सुंदर डान्स करताना दिसत आहे. तिच्या आजुबाजूला तिचे कुटुंब उभे आहेत. मुंबई पुणे मुंबई २ या चित्रपटातील बँड बाजा वरात घोडा या लोकप्रिय गाण्यावर ही नवरी नसताना दिसते पुढे व्हिडिओ तुम्हाला दिसेल की नवरदेव सुद्धा तिच्यासमोर येतो आणि तिच्याबरोबर नाचतो. त्यानंतर नवरदेव तिचा हात पकडतो आणि तिला स्टेजवर घेऊन जातो. नवरदेव नवरीला डान्स करताना पाहून सर्व जण आनंदी दिसतात. हा व्हिडिओ पाहून तुम्ही भारावून जाल. नवरी पंजाबी असताना सुद्धा मराठी लूकमध्ये तयार झालीये. तिचा लुक पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
हेही वाचा : भाजीपाल्याच्या दुकानात का लावले रागीट महिलेचे पोस्टर? पाहून नेटकऱ्यांना हसू आवरले नाही, Photo Viral
हेही वाचा : Viral Video : गैरवर्तन करणाऱ्या तरुणाची मुलीने केली चपलेने धुलाई, घडवली चांगलीच अद्दल; व्हिडीओ होतोय व्हायरल
इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले जेव्हा “पंजाबी नवरी मराठी गाण्यावर डान्स करते… नवरीची एन्ट्री”
या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना हा व्हिडिओ आवडला आहे. एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर दिसत आहे” तर एका युजरने लिहिलेय, ” खूप छान” काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.
काही दिवसांपूर्वी असाच एका नवरीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये नवरीने तिच्या बहिणीबरोबर ऐनवेळी डान्स केला होता. कोणतीही प्रॅक्टिस न करता नवरीने अप्रतिम डान्स केलेला पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता.