Pankha Baba Video Viral : सोशल मीडियावर अनेक वेळा भोंदू बाबा अंधश्रद्धा पसरवत असल्याचे पाहायला मिळते. कधी तव्यावर बसणारा बाबा, तर कधी पाण्यावर तरंगणारा बाबा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बाबांच्या प्रतापाचे किस्से ऐकायला मिळतात. यात आता पंखा बाबा चांगलाच ट्रेंडमध्ये आला आहे. या बाबाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. भगव्या रंगाचा कुर्ता घातलेला हा बाबा अनोख्या पद्धतीने भक्तांना आशीर्वाद देताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक बाबा हाताने फिरता पंखा थांबवतो आणि त्याच हाताने लोकांच्या कपाळावर स्पर्श करुन आशीर्वाद देतो. या बाबाच्या अनोख्या स्टाईलमुळे तो सोशल मीडियावर पंखा बाबा म्हणून प्रसिद्ध झाला आगहे. ज्याचा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे जो युजर्सच्याही पसंतीस पडत आहे. यावर युजर्स वेगवेगळ्या बाबांच्या प्रतापावर भाष्य करत आहेत.
जय पंखा बाबा, घ्या पंख्यातून आशीर्वाद
इन्स्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन – तीन लोक त्या बाबाला वर उचलून धरतात, यावेळी तो बाबा पंख्याकडे पाहतो आणि नंतर हाताने फिरता पंखा थांबवत समोर उभ्या असलेल्या लोकांना स्पर्श करुन आशीर्वाद देतो. हा व्हिडीओ wowcute_girl या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, जय पंखा बाबा, घ्या पंख्यातून आशीर्वाद.
या व्हिडिओला आत्तापर्यंत ३ कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच अनेक युजर्सनी या व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. भारतात बाबांची कमतरता नाही असे काही युजर्स म्हणत आहे. तर काहीजण लोकांमध्ये प्रचंड अंधश्रद्धा आहे असही म्हणत आहेत. त्याचवेळी एका यूजरने लिहिले की, ही क्लिप केवळ मनोरंजनासाठी बनवण्यात आली आहे. पण हा व्हिडिओ केव्हाचा आणि कुठला आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.