Viral video: आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्महत्येनंतर गेल्या काही वर्षांमध्ये समाजात त्या विषयी थोडी चर्चा होऊ लागली आहे. कोविड-१९ नंतर वाढलेल्या ताणतणावांच्या पार्श्वभूमीवर वाढत्या आत्महत्या हा एक गंभीर सार्वजनिक प्रश्न म्हणून समोर येऊ लागला आहे. काही घटना इतक्या भयानक घडतात की त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, काय लिहावं किंवा काय सांगावं ते सूचत नाही. अशाच एका तरुणाचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. “बाबा, माझ्या मुलांची काळजी घ्या. मी गंगेत उडी मारत आहे. असं बोलत व्हिडीओ बनवून तरुणानं आत्महत्या केली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशातील अनुपशहर भागात गंगा नदीत उडी मारण्यापूर्वी या तरुणानं व्हिडीओ बनवत आपल्या वडिलांना हृदय पिळवटून टाकणारा मेसेज पाठवला आहे. शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तरुणानं कुटुंबीयांना पाठवलेला हा व्हिडीओ पाहून स्थानिक अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली. या तरुणाचं नाव रिंकू असून या व्यक्तीने व्हिडीओमध्ये आपल्या वडिलांना संबोधित करताना आपल्या मुलांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. “बाबा, माझ्या मुलांची काळजी घ्या. मी गंगेत उडी मारत आहे. कृपया मला माफ करा, मला खरोखर त्रास झाला आहे,” असं तो या व्हिडीओमध्ये बोलला आहे.

अनुपशहर पोलिसांनी स्टीमर आणि डायव्हर्सच्या सहकार्याने शोध मोहीम सुरू केली. शोधप्रयत्न अनुपशहरच्या सर्व गंगेच्या घाटांवर आणि गंगेच्या पुलाच्या दोन्ही तीरांपर्यंत केला मात्र दिवसभर शोध घेऊनही रिंकूचा पत्ता लागला नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “यावर्षी मतदानच नाही करणार” शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी बोलवताच आजीबाई भडकल्या; हिंगोलीतील VIDEO व्हायरल

स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हिडिओ मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी कुटुंबाला आश्वासन दिले आहे की, रिंकूला शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

Story img Loader