भारत देश हा विविधतेसाठी ओळखला होता. भारतामध्ये भाषा, बोली, कपड्यांसह ही विविधता खाद्य संस्कृतीमध्येही दिसून येते. भारताच्या विविध भागांमध्ये तयार होणारे अनेक खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये विविध प्रकारचे स्ट्रीट फूड उपलब्ध आहेत. भारतीयांसाठी स्ट्रीट फूड प्रचंड आवडतं असले पण असेही काही स्ट्रीट फूड आहे जे ज्याला ‘सर्वात वाईट स्ट्रीट फूड’ म्हणून रेटिंग मिळाले.

टेल्ट ॲटलसच्या मते भारतातील सर्वात वाईट स्ट्रीट फूड आलू बोंडा आहे. यामध्ये या यादीत महाराष्ट्रातील प्रसिद्ध चाट दहीपुरीचाही समावेश आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

दही पुरी हा एक चाट पदार्थ आहे ज्यामध्ये बटाटे, हिरव्या-लाल चटण्या, शेव, डाळिंब, दही आणि पाणीपुरी वापरून तयार केले जाते. देशातील खाद्यप्रेमींच्या मते, ”ही डिश सर्वात वाईट स्ट्रीट फूड” आहे. त्याचबरोबर, सर्वात वाईट स्ट्रीट फूड म्हणून शेव नाव दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. भारतातील जवळपास सर्व स्ट्रीट फूडमध्ये शेवचा समावेश असतो. विशेष म्हणजे, दिल्लीचे पापडी चाटचा देखील यात समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा – ‘हे’ आहेत पुण्यातील प्रसिद्ध वडापाव! खवय्या पुणेकरांचे आवडते वडापावचे ठिकाण कोणते? जाणून घ्या

एवढेच नाही तर गुजरातचे प्रसिद्ध स्ट्रीट फूड ‘दाबेली’ तिसऱ्या क्रमांकावर असलेले सर्वात वाईट स्ट्रीट फूड मानले गेले आहे. आंबट- गोड असे, हे गुजराती स्ट्रीट फूड बटाटा पाव शेव डाळींब यापासून बनवली जाते. लोकांनी याला अतिशय वाईट अन्न असे देखील म्हटले आहे. यानंतर बॉम्बे सँडविच देखील खराब स्ट्रीट फूड म्हणून गणले गेले आहे. या डिशमध्ये काळी मिरी, जिरे आणि चाट मसाला घालून ब्रेड, काकडी, बटाटा आणि कांदा एकत्र तयार केला जातो. खाद्यप्रेमींनाही ते फूड देखील आवडले नाही.

भारतातील खराब स्ट्रीट फूडमध्ये अंड्याची भुर्जी देखील केली गेली आहे. हा पदार्थ लोकांचे पोट भरणारी आणि पटकन तयार होणार आहे . याशिवाय दही वड्याचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. उडीद डाळीपासून बनवलेला वडा आणि दही, चिंचेची चटणी, पुदिन्याची चटणी, शेव, डाळिंबाचे दाणे, चाट मसालासोबत तयार केला जातो. हा पदार्थही खराब स्ट्रीट फूडच्या यादीतही टाकण्यात आले आहे.

उपवासाच्या वेळी साबुदाणा प्रत्येक घरांमध्ये तयार केला जातो. साबुदाण्याची खिचडी आणि त्याचा वडाही बनवला जातो. स्ट्रीट फूडच्या यादीत साबुदाणा वडा सातव्या क्रमांकावर आहे. हे सर्वात वाईट स्ट्रीट फूड म्हणून खाद्यप्रेमीचे मत आहे. दुसरीकडे, देशातील कित्येक महिलांचा आवडता पदार्थ असलेल्या पापडी चाटचाही या यादीत समावेश आहे. दही, पुदिन्याची चटणी, हरभरा, बटाटा, चिंचेची चटणी, दही शेव ते पापडी याबरोबर दिल्या जाणार्‍या पापडी चाट या डिशचाही खराब स्ट्रीट फूडच्या यादीत समावेश आहे.

हेही वाचा – World Vada Pav Day 2023: मुंबईतील ‘हे’ प्रसिद्ध वडापाव तुम्ही खाल्ले आहेत का?

या यादीत चाट आणि स्ट्रीट फूड व्यतिरिक्त पराठ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. या यादीत गोभी पराठ्याचा समावेश आहे, ज्याला लोकांनी नापसंती दर्शवली आहे. ही यादी पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

Story img Loader