Parachute Shocking Video Viral : आकाशात भरारी घेतल्यानंतर अनेकांच्या अंगावर शहारे उभे राहतात. अशातच जर पॅराशूटचा वापर करून आकाशात गरुड झेप घेतली आणि लॅंडिंग होण्याआधीच दोरी तुटली, तर किती भयानक प्रसंगाला सामोरं जावं लागत असेल, याचा अंदाजही लावता येणार नाही. अशाच प्रकारचा एक थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीने पॅराशूटने उंच झेप घेतल्यानंतर पॅराशूटची दोरी अचानाक तुटके आणि काही सेकंदातच जे घडतं ते पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. पॅराशूटचा हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

@Enezator नावाच्या ट्वीटर अकाऊंटवर पॅराशूटचा धक्कादायक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओनं इंटरनेटवर धुमाकूळ घातला असून तमाम नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, पॅराशूट आकाशातून वेगानं खाली उतरताना दिसत आहे. कारण पॅराशूटची दोरी तुटल्याने समतोल बिघडतो आणि ते पॅराशूट वाऱ्याच्या वेगाप्रमाणे खाली येत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. पॅराशूटमध्ये बिघाड झाल्याने त्या व्यक्तीने स्वत:ला वाचवण्यासाठी पॅराशूट उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु, पॅराशूट पूर्णपणे उघडला नाही. त्यामुळे पॅराशूट खाली कोसळण्याची गती वाढली. मात्र, त्या व्यक्तीने पॅराशूट मॅन्यूअल पद्धतीने उघडलं आणि गती कमी झाली.

नक्की वाचा – सूर्यकुमार यादवने विराट कोहलीवर दिली भन्नाट प्रतिक्रिया, अनुष्का शर्माची इन्स्टाग्राम पोस्ट होतेय व्हायरल, कारण…

इथे पाहा व्हिडीओ

त्यामुळे काही वेळानंतर तो व्यक्ती सुखरुप जमिनीवर उतरला. व्हिडीओ शेअरक करत फिलीप नावाच्या व्यक्तीने म्हटलं, हा मृ्त्यूचा दिवस नव्हता. फक्त उंच उडाण घेतल्यानंतर काळजी घ्या आणि सुरक्षीत खाली उतरा.हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेक यूजर्सने प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलं, याच कारणामुळे अशाप्रकारची स्टंटबाजी करताना नेहमी भीती वाटते. अन्य एका यूजरने म्हटलं, मी पॅराशूट आणि स्काय डायविंग कधीच करणार नाही. तर तिसऱ्या एका यूजरने म्हटलं, अशाप्रकारचा धोकादायक प्रवास कधीच करू नका.