शिमलामध्ये जुन्गा परिसरात फ्लाइंग फेस्टिव्हल आयोजित करण्यात आले होते. चार दिवसांसाठी या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री सुखविंदर सिंहसुक्खू यांनी याची सुरुवात केली होती. कित्येकजण यात सहभागी झाले होते. दरम्यान या ठिकाणी एक अपघात जाला. एका सहभागीचा जीव थोडक्यात वाचला.

शिमला फ्लाइंग फेस्टिव्हल दरम्यान एका सहभागीचा जमीनीवर उतरताना अपघात झाला. पॅराग्लायडर लँडिग पॉइंटच्या दिशने येत होते पण त्याचे संतलून बिघडले आणि लँडिंग पॉइंटच्या साधारण १०० मीटर दूर एका झाडावर जाऊन आदळला. झाडावर धडकल्यामुळे पॅराग्लाइडरचे पॅराशूट झाडामध्ये अडकले होते या घटनेनंतर उपस्थिती लोकांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली.

police registered murder case after body found on mumbai ahmedabad highway
तो अपघात नव्हे तर हत्या; महामार्गावरील अपघाती मृत्यूचे गूढ उकलले
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
N 11 vulture released from Tadoba project reached Tamil Nadu after traveling 4000 kms but was electrocuted and died
चार हजार कि.मी. उड्डाण, पाच राज्यांतून प्रवास; तामिळनाडूत घेतला अखेरचा श्वास…
Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
two wheeler driver died in Akola on Tuesday after his throat was cut by nylon manja
नायलॉन मांजाचा फास, अकोल्यात गळा चिरून दुचाकी चालकाचा मृत्यू
tiger ran away from farmer
वाघ समोर उभा ठाकला, पण शेतकऱ्याने असे काही केले की पळून गेला; गडचिरोलीतील…
kites on Makar Sankranti
मकरसंक्रांतीला पतंग उडवितांना कुठल्या दुर्घटना घडतात माहिती आहे का?
nylon manjha, Kite festival
नायलॉन मांज्यामुळे दुचाकीस्वार जखमी, पतंग महोत्सवाच्या आयोजकांवर गुन्हा

जसा पॅराग्लायडर झाडावर आदळला तेव्हा त्याने दोन्ही पाय झाडावर ठेवून स्वत: जोरात मागे धक्का दिला त्यामुळे त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. तिथे विजेच्या तारा देखील होत्या पण त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. त्यामुळे पॅराग्लाइडरची दिशा थोडीशी जरी इकडे-तिकडे झाली असती तर तो विजेच्या तारांमध्ये अडकला असता आणि मोठी दुर्घटना झाली असती. पण त्याचा जीव थोडत्यात वाचला.

हेही वाचा – आईची लिपस्टिक घेऊन चिमुकलीने रंगवले टॉयलेट! गोंडस व्हिडीओ पाहून लोकांना आठवले त्यांचे बालपण

सोशल मीडियावर या दुर्घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतप तुम्ही समजले की, हा अपघात कसा झाला. पहिल्यांदा शिमलामध्ये फ्लाइंग फेस्टिवल आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये जिंकणाऱ्याना दोन लाख रुपये बक्षीस दिले जाणार आहे. देशातीलच नव्हे तर परदेशातील लोकही स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शिमलामध्ये पोहचले आहेत.

हेही वाचा – ‘बेशरम रंग’ गाण्यावर शाळकरी मुलाने केला जबरदस्त डान्स! व्हिडीओ पाहून दीपिका पदुकोणलाही विसरून जाल

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हे फेस्टिव्हल आयोजित करण्यात आल्याचे समजते. पर्यटन विभागातर्फे या फेस्टिव्हलचे

आयोजन करण्यात आले होते. आयोजकांनी सांगितले की, सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. संतुलन बिघण्यामुळे हा अपघात झाला होता पण आता सर्व परिस्थिती नियंत्रणात आहेत आणि तो पॅराग्लायडर देखील सुरक्षित आहे.

Story img Loader