Funny video: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात भाविकांचा जनसागरच लोटला आहे. देश-विदेशातून आलेल्या भाविकांमुळे गंगेचा काठ फुलून गेला आहे. यावेळी जगभरातून येणाऱ्या लोकांच्या गर्दीत, गोंधळात व्यक्ती त्यांच्या कुटुंबांपासून विभक्त होण्याची शक्यता नेहमीच असते. अशावेळी हरवून जाऊ नये म्हणून एक अनोखी कल्पना शोधून काढली आहे. एवढ्या गर्दीमध्ये मोठी लोकंही गोंधळून जातात अशातच लहान मुलांना तर घेऊन जायलाच नको. मात्र तरीही काही लोक एवढ्या गर्दीत स्वत:बरोबरच आपल्या लहान बाळांचाही जीव धोक्यात घालतात. असंच एक कुटुंब आपल्या दोन लहान मुलांना घेऊन कुंभमेळ्याला आले. मात्र त्यावेळी ती मुलं हरवू नये म्हणून असा जुगाड केला की तुम्हीही कौतुक कराल.
लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं. त्यांच्याकडे झालेलं थोडसं दुर्लक्ष अनेकदा महागात पडू शकतं. बच्चेकंपनी खेळताखेळता काय करतील, याचा नेम नसतो. अशावेळी जर ही लहान मुलं हरवली तर वेगळं टेंशन. कुंभमेळ्यात इतकी प्रचंड गर्दी असते की दोन मिनिटांसाठी हात सुटला तरी मुलं हरवू शकतात. अन् या मुलांना व्यवस्थित बोलता नसेल किंवा त्यांना आपल्या पालकांचा फोन नंबर माहित नसेल तर अशा स्थितीत या मुलांना त्यांच्या पालकांपर्यंत नेऊन सोडणं पोलिसांसाठी आणखी आव्हानात्मक होतं. पण पोलिसांचा हा त्रास वाचावा यासाठी मुलांच्या पालकांनी भन्नाट जुगाड शोधून काढला. त्यांनी या मुलांच्या पाठीवर त्याची पूर्ण माहितीच चिकटवली.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महाकुंभमेळ्यात तीन लहान मुलं चालत आहेत. यावेळी दोघांच्या कपड्यांच्या मागे त्यांची नाव गाव नंबर अशी संपूर्ण माहिती लिहली आहे. जेणेकरुन जर कुणी हरवले तर या माहितीमुळे कुटुंबाशी सहज संपर्क साधता येईल.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्याला लक्षणीय व्ह्यूज, लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “आपली सुरक्षा अपने हाथ (तुमची सुरक्षा तुमच्या हातात).” दुसऱ्याने टिप्पणी केली, “खूप चांगले.” आणखी एका वापरकर्त्याने टिप्पणी केली, “हा विचार देशाबाहेर जाऊ नये,” तर दुसऱ्याने त्याच्या कल्पकतेचे कौतुक करत लिहिले, “त्याच्या विचारांना लाखो सलाम.” असं म्हंटलंय.