प्रत्येक आई-वडीलांना वाटते की आपल्या मुलांना आपल्यापेक्षा जास्त सुखात ठेवावे. ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या नाही त्या आपल्या लेकरांना मिळाव्या. आपल्या लेकरांना कशाचीही कमी पडू नये यासाठी आई-वडील कितीही कष्ट सहन करतात. वेळ पडली तर स्वत:उपाशी राहतात पण आपल्या लेकराला उपाशी राहू देत नाही. कारण आई-वडील आपल्या लेकरांवर मनापासून जीवापाड प्रेम करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फुलाप्रमाणे आपल्या मुलांना जपतात. पण अनेक मुलांना आपल्या आई-वडीलांचे हे प्रेम दिसतंच नाही. आई-वडीलांचा ओरडले, एखाद्या गोष्टीसाठी नकार दिला तर लगेच या मुलांना त्यांचा राग येतो पण त्यामागे त्यांचा हेतू समजून घेण्याचा प्रयत्न कधीच करत नाही. कोणतेच आई-वडील आपल्या मुलांचे वाईट चिंतत नाही उलटं नेहमी त्यांचे चांगलं व्हावे हाच विचार त्यांच्या मनात असतो. आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावे, त्यांना काय चूक-काय बरोबर हे समजावे, चांगले लोक आणि वाईट लोक ओळखता यावे हे समजावे हाच त्यांचा हेतू असतो पण मुलांना मात्र आई-वडीलांच्या मनातील हा हेतू अनेकदा कळत नाही.

येथे पाहा Viral Video

हेही वाचा –“आई ही आई असते!” मुलगा जिंकल्यानंतर धावत स्टेजवर गेली अन् मारली मिठी, Viral Videoमध्ये बघा आईला झालेला आनंद

ट्रकमागील पाटी चर्चेत

अशा मुलांना सत्याची जाणीव करून देणारी एक ट्रकमागील पाटी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. इंस्टाग्रामवर lay_bhari_official नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये एका ट्रकच्या मागे आईवडीलांच्या प्रेमावर काही ओळी लिहिल्या आहेत. “तुमचं भलं व्हावं असं जगात फक्त तुमच्या आई-वडीलांनाचं वाटत असतं.”
व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “जगातील अंतिम सत्य हेच आहे!”

हेही वाचा – आनंदाला वयाची मर्यादा नसते! चंद्रा गाण्यावर थिरकले आजोबा आणि नात, धमाल नृत्याचा Viral Video एकदा बघाच

आई-वडीलांसारखं निस्वार्थ प्रेम कोणीही करत नाही

खरंच आई-वडीलांसारखे निर्मळ आणि निस्वार्थ प्रेम या जगात कोणीही करू शकत नाही. अनेकदा आपल्याला असे लोक भेटतात जे आपल्याशी चांगले वागतात, चांगल्या पद्धतीने बोलतात पण त्यांच्या मनात मात्र आपल्याबद्दल प्रचंड द्वेष असतो. काही लोक गोड गोड बोलतात आणि मनातल्या मनात आपली इर्षा करतात. अगदी बहिण-भावडांना देखील एकमेकांबद्दल इर्षा वाटते. कोणत्याही स्वार्थाशिवाय, कोणत्याही अटी शिवाय आपल्यावर खरं प्रेम फक्त आपले आई-वडीलच करतात. नेहमी आपल्या भल्याचा विचार फक्त आणि फक्त आई-वडीलचं करतात. त्यामुळे कायम लक्षात ठेवा की,”आपले वडील आपल्याला जे काही सांगतात ते फक्त आणि फक्त आपल्या भल्यासाठीच असते.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parents are the only ones who always want whats best for you this is the ultimate truth in the world viral poster on truck is viral snk