सोशल मीडियावर अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होत असतात ज्यामुळे रस्ता सुरक्षेचा मुद्दा नेहमी चर्चेत असतो. जगभगात रस्ते अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. भारतातही दरवर्षी दीड लाख व्यक्ती रस्ते अपघातात मरण पावतात. वाहन चालवताना एक चूक आपल्या जीवावर बेतू शकते असे असतानाही लोक निष्काळजीपणे वाहन चालवतात. एवढचं काय तर अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. पालकांच्या निष्कळाजीपणा मुलांचं आयुष्य खराब करू शकते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकला कार चालवत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, एका धावत्या कारमध्ये एका चिमुकला त्याच्या पालकांनी निष्काळजीपणे स्टेअरिंगजवळ उभे केले आहे. चिमुकला ‘त्या’ स्टेअरिंगबरोबर खेळत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. कार भरधाव वेगाने धावत आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.

हेही वाचा – ताम्हिणी घाट, लोणवळ्याची घटना ताजी असताना नवा व्हिडीओ चर्चेत! एका मिनिटांत धबधब्याचे पाणी कसे वाढते, पाहा Viral Video

व्हिडीओ roadsafetycontent नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे,”वाहन चालवणे ही लहान मुलांच्या खेळण्याची वस्तू नाही. वाहन चालवताना तुमची एक चूक तुमचं आणि इतरांच कुटुंब उध्वस्त करू शकते.” व्हिडीओवर कमेंट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ” मुलांचे फालतू लाड करू नका”

दुसरा म्हणाला, “पोलिसांना निवेदन आहे हा शेवटी गुन्हा आहे. अचानक समोरून कोण तरी आले तर या बाळाला बाजूला ठेवणार का? स्टिअटिरींग सांभाळणार? म्हणजे समोरचा व्यक्ती आणि गाडीतील लोक जीव धोक्यात जातो. अशा लोकांना गुन्हा दाखल करा”

हेही वाचा – “मोत्यापेक्षा सुंदर अक्षर!”, दुसरीत शिकणाऱ्या चिमुकलीचं हस्ताक्षर ठरतोय चर्चेचा विषय, Viral Video एकदा बघाच

लहान मुलांच्या हातात वाहन चालवण्यास देणे अत्यंत चुकीचे आहे. व्हिडीओ करण्याच्या नादात मुलांचे चुकीचे हट्ट पुरवणाऱ्या पालकांनी असे करू नये. पालक म्हणून आपल्या मुलांसाठी काय योग्य आणि काही नाही हे ओळखून सुज्ञपणे वागणे त्यांच्या भल्याचे आहे. अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणाऱ्या पालकांवर कठोर कारवाईची तरतूद कायद्यात आहे. त्यामुळे पालकांनो, सावध रहा आणि सुरक्षित वाहन चालवा.