रुग्णालयातून बाळ चोरी होण्याच्या घटना काही नविन नाहीत. अशा अनेक घटना आजवर घडल्या आहेत. अनेकदा चोरीला गेलेलं बाळ शोधण्यात यश मिळतं. पण काही वेळेला बाळ शोधणं कठीण होतं. लहान बाळ आई वडिलांसाठी काळजाचा तुकडा असतो. लहान बाळाला थोडी जरी इजा झाली तरी वेदना होतात. मॅक्सिकोत राहणाऱ्या यासिर मॅशिअल आणि रोजलिया लोपेज यांनाही अशा प्रसंगातून जावं लागलं. २००५ या वर्षी या जोडप्याला एक मुलगा झाला. दोघंही मुलाच्या जन्मानंतर खूश झाले होते. मात्र १५ डिसेंबर २००५ रोजी रुग्णालयातून बाळ चोरीला गेलं. त्यानंतर १६ वर्ष शोध घेतल्यानंतर अखेर मुलाचा शोध लागला.
१५ डिसेंबर २००५ च्या रात्री लोपेझ यांना IMSS हॉस्पिटल जनरल रीजनलमध्ये दाखल करण्यात आले होते. मुलाच्या जन्मानंतर तिला काही दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले होते. त्या रात्री एक महिला नर्स बनून हॉस्पिटलमध्ये आली आणि लोपेझकडून मुलाला घेऊन तिला आराम करण्यास सांगितले. त्यानंतर या जोडप्याने आपल्या मुलाला पाहिले ते शेवटचे होते. त्यानंतर बाळ चोरीला गेल्याचं कळल्यानंतर त्यांना धक्का बसला. हे दु:ख त्यांनी १६ वर्षे भोगलं. जोडप्याला १६ वर्षांनंतर आपल्या मुलाला भेटण्याची संधी मिळाली. पण मुलाला शोधणे सोपे नव्हते.
Video: नन्सचा फुटबॉल खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांनी दिली पसंती
मुलाचा शोध घेण्यासाठी त्यांनी एका तज्ज्ञाची मदत घेतली. गेल्या वर्षी सप्टेंबर २०२१ मध्ये जलिस्को इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्सेसने मुलाच्या जुन्या फोटोवरून चेहऱ्याचे सखोल विश्लेषण केले आणि १६ वर्षांनंतर मूल कसे दिसत असेल याचा अंदाज लावला. त्यानुसार मुलाचे चित्र तयार केले गेले आणि पुन्हा शोध सुरु झाला. १-२ महिने शोध घेतल्यानंतर तपास पथकाला चित्रासारखाच एक तरुण सापडला. त्यानंतर टीमने त्याचा आणि जोडप्याचा डीएनएन जुळवला. दोघांचे डीएनए ९९.९ टक्के जुळले. डीएनए जुळल्यानंतर तो मुलगा महिलेचा असल्याचं सिद्ध झालं. या चाचणीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. मात्र, तपास अधिकारी अद्याप महिला चोराचा शोध घेत आहेत. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.