लहाणपणी तुम्ही चिमणीची ती गोष्ट ऐकली असेल ना…चिमणी आपल्या पाखरांना जन्म देण्यासाठी एक एक काडी जोडून घरटं बांधते. त्यांना जन्म देते. त्यांना खाऊ लागते. पिल्लांच्या पंखामध्ये बळ देते. एक दिवस पिल्लू उंच आकाशात उडू लागते. चिमणीला माहित असते की एकदा तिचे पिल्लू उडायला शिकले तर पुन्हा घरट्याकडे परतणार नाही तरीही ती पिल्लांच्या पंखाना बळ देत राहते, त्यांना आकाशात उडायाला शिकवते. यालाच तर खरं निस्वार्थ प्रेम म्हणतात जे फक्त आई-वडील आपल्या मुलांवर करतात.

आई-वडीलांसारखं निर्मळ आणि निस्वार्थ प्रेम या जगात कोणीही करू शकत नाही असे म्हणतात. मुलांचे सर्व हट्ट आणि गरजा पूरवण्यासाठी आई-वडील दिवस रात्र काबाडकष्ट करतात त्याबदल्यात त्यांची कसलीही अपेक्षा नसते. बोट धरुन चालायला शिकवण्यापासून एक दिवस तेच बोट सोडून खऱ्या आयुष्यात स्वत:च्या पायावर उभे राहायला शिकवणारे आई-वडीलच असतात. लेकरू कितीही दुर गेलं तरी आई-वडीलांचा जीव मात्र त्याच्यामध्ये अडकलेला असतो. अशाच प्रकारे आपल्या लेकीला निरोप देणाऱ्या आई-वडीलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक झाले आहे.

womens drum, womens in drum corps,
ढोलपथकातल्या ‘तिची’ दुखरी बाजू…
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
ex corporator demand compensation for jogeshwari residents for suffer heavy loss due to rain
अतिवृष्टीबाधित जोगेश्वरीवासियांना नुकसान भरपाई द्या- जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
women prostitution, Nagpur, husband Nagpur,
देहव्यवसायाच्या दलदलीतून बाहेर पडत ती पुन्हा संसारात रमली
parents children self reliant chaturang article
सांदीत सापडलेले : काळजी
sant gadgebaba sevabhavi sanstha ambajogai
सर्वकार्येषु सर्वदा: गरजू मुलांच्या शिक्षणासाठी मदतीची गरज
pune city have no toilets anywhere for people during ganpati visarjan
पुण्याच्या पाहुण्यांची परवड
Nagpur, Thieves stole donation box Mahal,
साक्षात ‘विघ्नहर्ता’ मंडपात, तरीही चोरट्यांनी साधला डाव

हेही वाचा – आनंद महिंद्रा यांनी भारतीय संघावर ‘गंभीर क्रूरतेचा’ आरोप करत दिली शिक्षा, कारण ऐकून बसेल धक्का

आज काल नोकरी-शिक्षणासाठी गावातील मुलं शहरात जावे लागते तेव्हा काळजावर दगड ठेवून आई-वडील आपल्या लेकरांना निरोप देतात. अशा एका गावावरून शहरात निघालेल्या एका मुली आईवडील त्याला निरोप देण्यासाठी रेल्वेस्टेशनला आलेले दिसत आहे. मुलीला रेल्वे गाडीत बसवून देऊन दोघेही स्टेशनवरील बाकडावर बसताना दिसतात. गाडी जशी हळू हळू धावू लागते तसे आपल्या लेकराला हात दाखवत निरोप देत आहे. मुलीची आईल मुलीला दरवाज्यात उभे राहू नको, आत जाऊन बस असे ओरडून सांगत आहे.

हेही वाचा –“केदारनाथ यात्रा व्यवस्थेचा भांडाफोड?” घोड्यावरून पडल्याने यात्रेकरू जखमी, महिलेने रडत मांडली व्यथा; पाहा Viral Video

इनस्टाग्रामवर chetu005 नावाच्या पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटले आहे. व्हिडीओ पाहून कोणाला दूर असलेल्या लेकारांची आठवण आली तर कोणाला गावी असलेल्या आई-वडीलांची आठवण झाली. व्हायरल व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडला आहे. व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले,” आई वडील जेवढी काळजी घेऊ शकतात तेवढी काळजी कोणीच करू शकत नाही.” दुसरा म्हणाला, “काळजाचा तुकडा मुंबईत पाठवायचे म्हणजे साधं काम नाही, येथे क्षणा क्षणाला मरणाला तोंड द्यावे लागते.” “मनावर दगड ठेवून स्वप्नांच्या पाठी जाताना जीव खरंच आतून तुटतो” असे तिसरा म्हणाला.