Viral video: जगातील सर्वात विचित्र प्राण्यांची गणना केल्यास, मानव प्रथम येईल. सर्वात हुशार मानला जाणारा हाच मानव कधी काय करेल याचा नेम नाही. त्याचे छंद आणि आवडीही कधी कधी फार विचित्र असतात. यातच हल्ली फोटोचं वेड इतकं वाढलंय की, फोटोसाठी लोक काहीही करायला तयार असतात. एखाद्या पर्यटनस्थळी, एखाद्या प्राण्या पक्षासोबत तसेच धोकादायक प्राण्यासोबतही फोटो काढण्यासाठी काहीजण इच्छूक असतात. पण कधी कधी अशा कृती धाडसाच्या नसून मूर्खपणाच्या वाटतात. कारण त्या जीवावर बेतू शकतात. असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे. फोटो काढण्यासाठी पालकांनी मुलांना जिवंत मगरीसमोर उभं केलंय मात्र पुढे जे घडलं ते पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.

सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात. तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. तुम्हाला तर माहिती आहे की मगर ही सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. तिच्या जबड्यात अगदी मोठा प्राणी फसला तरी त्याचं वाचणं जवळपास अशक्य होऊन जातं.

Shocking video Couple Dies, 2 Children Injured As Car Collides With Truck On Ahmedabad-Vadodara Expressway
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; कारचा चेंदामेंदा, आईवडीलांचाही मृत्यू,भयंकर अपघातानंतरही २ मुलं कशी बचावली
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Emotional Viral Video in school
Video : शिक्षिकेने आईवडिलांविषयी विचारलं अन् चिमुकली ढसा ढसा रडायला लागली; Video होतोय व्हायरल
success story police son surprised mother with police result emotional video goes viral
“आई तुझा लेक पोलीस झाला गं” तरुणानं कित्येक पिढ्यांचं दुःख दूर केलं; माय-लेकाचा VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी
Shocking video Young Man Risks His Life By Climbing 30-Ft Hoarding On Highway For Instagram Reel In UP's Saharanpur
“हे सगळं करताना एकदाही आई-वडील आठवत नाहीत?” तरुणानं रीलसाठी अक्षरश: कळस गाठला; VIDEO पाहून थरकाप उडेल
leopard cub , leopard , Katol taluka,
VIDEO : दुरावलेल्या आई-पिल्लाची २४ तासानंतर भेट
Muramba
Video: रमाच्या आईला ओळखण्यात माही चूक करणार अन्…; अक्षय सत्य शोधून काढणार? ‘मुरांबा’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Video Shows Father And Daughter love
VIDEO: वडिलांजवळ ढसाढसा रडली नवरी, तर दुसरीकडे बाबांच्या कुशीत खेळतेय चिमुकली; बघता क्षणी डोळ्यात पाणी आणेल ‘हा’ क्षण

सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये एक कुटुंब दिसत आहे. ज्यामध्ये लहान मुले आणि पालक देखील आहेत. पालक आणि मुले कुठेतरी जात असताना रस्त्यात मगर दिसली. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता रस्त्यावर दोन मुलं दिसत आहे. त्यांचे पालक त्यांना रस्त्याच्या कडेला उभं करतात आणि त्यांचा फोटो काढताना दिसतात. तसं पाहायला गेलं तर हे दृश्य सामान्य. पण दिसतं तितकं ते सामान्य नाही. कारण रस्त्याच्या कडेला उभी असलेली ही मुलं चक्क मृत्यूच्या जबड्याजवळच आहेत, असंच म्हणावं लागेल.आत्तापर्यंत बरं होतं, त्यानंतर आई-वडील जबरदस्तीने मुलांना मगरीच्या आणखीन जवळ जाण्यासाठी सांगत आहेत. मुले भीतीपोटी आपल्या पालकांचं एकत आहेत. मात्र हे किती जिवघेणं आहे हे व्हिडीओमध्ये दिसत आहे. मगरीनं जबडा उघडलेला आहे आणि ती इतकी जवळ आहे की व्हिडीओ पाहताना आपल्या हृदयाची धडधड वाढते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> कडक सॅल्यूट! लेकीला पहिल्यांदा वर्दीमध्ये पाहून आईच्या अश्रूंचा बांध फुटला; VIDEO पाहून व्हाल भावूक

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @ramprasad_c नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ३ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर विविध प्रकारच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. एका वापरकर्त्याने पालकांवर टीका केली आहे.

Story img Loader