Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी लोक वाट्टेल ते व्हिडीओ बनवत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की चिमुकल्याचे डोकं जिन्याचे रेलिंगमध्ये अडकलेले आहे आणि तो काढण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर त्याचे आई वडील येतात आणि हे पाहून घाबरतात. पण पुढे जे काही घडते, ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल आणि तुम्हालाही वाटेल की लोकं प्रसिद्धीसाठी काहीपण करतात. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओ एका घरातील आहे. या व्हिडीओमध्ये जिन्याच्या रेलिंगमध्ये एका चिमुकल्याचे डोके अडकलेले दिसत आहे. हा चिमुकला रेलिंगमधून डोके बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न करताना दिसतो. तिकक्यात त्याचे आईवडिल येतात आणि त्याचे डोके बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात पण त्यानंतर ते वडील हत्यार आणतात आणि आई फोन करायला मोबाईल खिशातून काढते. तितक्यात हा चिमुकला बाहेर स्वत:हून रेलिंगमधून सहजपणे बाहेर पडतो आणि आईवडिलांची खोडी केल्याचे सांगतो. हे पाहून आई वडील अवाक् होतात.
तुम्हाला वाटेल, हे खरंच घडलं का? तर नाही तर हा व्हिडीओ रिलसाठी बनवला आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून धक्का बसेल पण हा व्हिडीओ स्क्रिप्टेड आहे. मनोरंजनाच्या दृष्टीने विचार केला तर हा व्हिडीओ अनेकांना आवडू शकतो पण सोशल मीडियावर लहान मुलांनी हा व्हिडीओ बघून असेच अनुकरण करू नये.

svthalasserycouple या इन्स्टाग्राम अकाउंटरवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ओह माय गॉड” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतितक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हा व्हिडीओ त्रासदायक आहे. जर लहान मुलांनी हा व्हिडीओ पाहिला आणि त्याची नक्कल केली तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. अशा व्हिडीओवर इन्स्टाग्रामनी बंदी घातली पाहिजे” तर एका युजरने लिहिलेय, “हे खरच घडलेलं नाही तर स्क्रिप्ट आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “मुलाने तर आईवडिलांबरोबर स्कॅम केलाय. ” काही लोकांना हा व्हिडीओ आवडला नाही तर काही लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला. काही जणांनी हसण्याचे इमोजी सुद्धा केले आहे.