Parineeti Chopra- Raghav Chadha Income: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांच्या अफेअरच्या चर्चा रंगत आहेत. दोघेही दोन दिवस मुंबईत एकत्र दिसले होते, यावरून चर्चा रंगत होत्या. तर आप खासदार संजय अरोरा यांनी शुभेच्छा देत या दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यानंतर पंजाबी गायक हार्डी सिंधुनेही परिणीती व राघव चड्ढा यांना शुभेच्छा दिल्या होत्या. परिणीती चोप्रा ही मागील काही वर्षात बॉलिवूडमध्ये फार कमाल करू शकली नसली तरी आजही ती बॉलिवूडच्या उच्च नेट वर्थ असलेल्या अभिनेत्रींनपैकी एक आहे. प्राप्त माहितीनुसार परिणीतीची नेट वर्थ जवळपास ६० कोटी आहे. तर दुसरीकडे खासदार राघव चड्ढा यांच्याही प्रॉपर्टी व संपत्तीबाबत माय नेता डॉट इंफोवर माहिती देण्यात आली आहे.
राजेशाही व ग्लॅमर्स आयुष्य जगणाऱ्या परिणितीशी लग्नाच्या चर्चांमुळे लोकांना राघव चड्ढा यांच्या संपत्तीविषयी सुद्धा कुतुहूल आहे. निवडणुकीच्या वेळी स्वतः राघव चड्ढा यांनी आपल्या कामाचे, मिळकतीचे व संपत्तीचे दाखले सादर केले होते. राघव चड्ढा यांच्याकडे जवळपास ३७ लाख रुपयांची प्रॉपर्टी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर त्यांच्यावर कोणतेही कर्ज नाही किंवा कुणाला उधारीही दिलेली नाही. राघव चड्ढा यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही किंवा प्रॉपर्टीच्या नावावर त्यांच्याकडे घर किंवा जमीन सुद्धा नाही असेही त्यांनी निवडणुकीच्या वेळी सांगितले होते.
राघव चड्ढा यांच्याकडे एक मारुती स्विफ्ट डिझायर गाडी व ९० ग्राम सोन्याचे दागिने आहेत ज्यांची किंमत साधारण ५ लाखापर्यंत आहे. याशिवाय त्यांनी बॉण्ड्स, डिबेंचर व शेयर्स मध्ये ६ लाख ३५ हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. बँक बॅलन्सच्या नावावर त्यांच्याकडे १४ लाख ५७ हजार रुपयांचे सेव्हिंग आहे तर तर अन्य संपत्तीवर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम जवळपास ९ लाख पर्यंत आहे. राघव यांच्या नावे ५२ हजार रुपयांचा विमा सुद्धा. यासगळ्याची एकूण रक्कम ३६ लाख ९९ हजार ८७१ इतकी होते, जी राघव यांची एकूण संपत्ती आहे.
हे ही वाचा<< गरीब कुटुंबाला तिकीट काढूनही थिएटरमध्ये प्रवेश नाकारला; Video पाहून भडकण्याआधी मालकाची बाजूही वाचा
राघव चड्ढा हे आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहकारी असून अगदी सुरुवातीच्या काळापासून ते पक्षाच्या उभारणीचा भाग होते. दरम्यान लग्नाच्या चर्चांवर परिणीतीने मौन बाळगलं असलं तरी राघव चड्ढांच्या काही वक्तव्यांमुळे लवकरच हे दोघे लग्न करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.