सोशल मीडियावर रोज या ना त्या कारणाने व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात प्राण्यांच्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. त्यांच्या हरकती पाहून कधी हसायला, तर कधी आश्चर्याचा धक्का बसतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक पोपट आपल्या मालकाला मदत करताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक पोपट त्याच्या चोचीने मालकासाठी एनर्जी ड्रिंक उघडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.
सामान्यतः लोक कोल्ड्रिंक्स पिताना कॅन किंवा बाटली स्वतः उघडताता. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक रंगीबेरंगी पोपट त्याच्या मालकापासून काही अंतरावर दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. मालकाकडून इशारा मिळाल्यानंतर पोपट वेगाने पंख पसरवतो आणि त्याच्यापर्यंत पोहोचतो. त्यानंतर एनर्जी ड्रिंकचे कॅन उघडून देण्यासाठी सरसावतो. त्याच्या चोचीत कॅनचा हूक अडकवतो आणि हळुवारपणे दाबतो. काही सेकंदात हा कॅन उघडून देतो.
हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. तसेच युजर्स व्हिडीओखाली मजेशीर कमेंट्सही देत आहेत.