सोशल मीडियावर असेल बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये प्राणी माणसाच्या काही वस्तू पळवून नेतात. गेल्या काही दिवसांपूर्वीच एका सुंदरशा पिवळ्या रंगाच्या पोपटाने एका महिलेचे महागडे इअरफोन पळवले होता. अशीच एक घटना दक्षिण अमेरिकेच्या चिली देशातील एका पत्रकाराबरोबर घडली आहे. विशेष म्हणजे यावेळी हा पत्रकार शहरात झालेल्या एका चोरीच्या घटनेचे वार्तांकन करत होता. त्याचवेळी पोपटाने या पत्रकाराच्या कानात असलेला इअरफोन पळवला.
जेन हैलहेड नावाच्या एका महिलेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून नेटकरी तो इतर प्लॅटफॉर्म्सवरही शेअर करत आहेत. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की निकोलस नावाचा पत्रकार एका शहरात झालेल्या चोरीच्या घटनेचे वार्तांकन करत आहे. याचवेळी एक पोपट येऊन निकोलसच्या खांद्यावर बसतो. यावेळी हा पत्रकार थोडा दचकतो, मात्र तो आपले वार्तांकन सुरू ठेवतो.
हेही वाचा : बाळाला कडेवर घेऊन भाषण केलं म्हणून महिला आयएएस अधिकारी ट्रोल; पतीने दिलेलं उत्तर जिंकेल तुमचं मन
काही सेकंद हा पोपट निकोलसचे निरीक्षण करतो आणि कोणालाही काही कळायच्या आतच त्याचा एक इअरफोन घेऊन पसार होतो. या घटनेने निकोलस गोंधळून जातो, मात्र वार्तांकन सुरु ठेवण्याशिवाय त्याच्याकडे कोणताच पर्याय शिल्लक नसतो. तथापि, काही रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार काही अंतरावर गेल्यानंतर पोपटाने हा इअरफोन टाकला. यानंतर पत्रकाराला तो सापडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
हेही वाचा : ‘ठंडे-ठंडे पानी से नहाना चाहिए’, IFS अधिकाऱ्याने शेअर केलेला हत्तींचा अंघोळ करतानाचा मजेदार Video एकदा पाहाच
दरम्यान, वार्तांकन करत असताना पत्रकाराबरोबर अशा विचित्र घटना घडण्याचे हे एकच उदाहरण नाही. याआधीही अशा घटना घडल्या असून त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सप्टेंबर २०२२मध्ये कॅनडा येथे वृत्तनिवेदन करत असताना एका महिला पत्रकाराच्या तोंडात माशी गेली होती. बातमी वाचत असतानाच हवेत उडणारी माशी तिने चुकून गिळली होती. तर ईदच्या दिवशी वार्तांकन करत असणाऱ्या पाकिस्तानच्या एका महिला पत्रकाराने त्रास देणाऱ्या एका मुलाला कॅमेरासमोरच कानाखाली मारली होती.