Viral video: आजकाल सोशल मीडियावर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. कोणता व्हिडीओ कधी व्हायरल होईल याचा अंदाज बांधणं फार कठीण आहे. आजकाल सोशल मीडियावर सर्वात जास्त प्राण्यांचे पक्षांचे व्हिडीओ व्हायरल होतात मग ते पाळीव प्राण्यांचे असो वा जंगली प्राण्यांचे. सध्या असाच एक आगाऊ पोपटाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पोपट हा जगातील एकमेव असा पक्षी आहे; जो मानवी आवाजांचे हुबेहूब अनुकरण करू शकतो. जो माणसासारखे बोलू शकतो. एखाद्या व्यक्तीने तोंडून उच्चारलेले शब्द ऐकून तो ते पुन्हा म्हणू शकतो. जगातील कोणताही प्राणी किंवा पक्षी असे करू शकत नाही. याच पोपटाचं आणि त्याच्या मालकिणीचं इंग्रजीतलं संभाषण सध्या व्हायरल होतंय..तु्म्हीही पाहा हा व्हिडीओ

पोपटांची जीभ जाड असते; जी त्यांना आवाजाचे अनुकरण करण्यास मदत करते. पोपट विशेषतः मानवी शब्द आणि आवाजांचे अनुकरण करण्यात पटाईत असतात. उदाहरणार्थ- पोपट “हॅलो, कसे आहात?” असे सहज म्हणू शकतो. असे असले तरी पोपटांना माणसाप्रमाणे समज नसते किंवा माणूस काय बोलत आहे हे त्यांना कळत नसते; परंतु तुम्ही ज्या गोष्टी रोज वारंवार बोलता, त्या ऐकलेल्या गोष्टी पुन्हा त्याच पद्धतीने उच्चारण्यात पोपट खूप पटाईत असतात.

या व्हिडीओमध्येही तुम्ही पाहू शकता, हा पोपट अशी अॅक्टींग करतोय की पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. झालं असं की, या पोपटाची मालकीण आजारी आहे तिला सर्दी खोकला झाला आहे. यावेळी हा पोपट म्हणतोय मी सुद्धा आजारी आहे आणि त्याच प्रमाणे तो सर्दी झाल्याची अॅक्टींग करतोय. ही जबरदस्त अॅक्टींग पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “नको बया डोसक्याला ताप”; अभ्यास न करण्याचं चिमुकलीनं कोल्हापुरी स्टाईलमध्ये सांगितलं भन्नाट कारण; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

जगभरात आढळणाऱ्या पक्ष्यांच्या विविध प्रजातींशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज पाहायला मिळतात. बरेच लोक काही प्रजातीचे पक्षी आपल्या घरात पाळीव प्राणी म्हणून ठेवतात आणि कुटुंबातील सदस्यांप्रमाणे त्यांची काळजी घेतात. जगभरात आढळणाऱ्या पक्ष्यांच्या विविध प्रजातींशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज पाहायला मिळतात. व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @cosmothefunnyparrot नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इतका मजेदार आहे की, लोक तो पुन्हा पुन्हा पाहत आहेत. सोबतच ते यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त करत आहेत. एकाने लिहिले,”मला त्या पक्षाची नियुक्ती करायची आहे” दुसरा म्हणतो, “निसर्गाची स्वत:ची एक प्रक्रिया असते”.

Story img Loader