भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नुकतच वयाच्या ३१ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. बांगलादेश दौऱ्यातून विश्रांती घेतलेला विराट कोहली आपली पत्नी अनुष्का शर्मासह भूतानमध्ये आहे. वाढदिवशी विराटच्या आजी-माजी सहकाऱ्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवर विराटसोबतचा एक फोटो पोस्ट करत त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

मात्र या फोटोवरुन नेटकऱ्यांनी रवी शास्त्री यांनाच ट्रोल केलं आहे.

दरम्यान बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत भारत सध्या १-० ने पिछाडीवर आहे. दुसरा सामना गुरुवारी राजकोटच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यावर पावसाचं सावट असल्यामुळे भारत या मालिकेत बरोबरी साधतो का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader