Viral Video: आजकाल अनेक जण उबर आणि ओलाने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. कारण – रिक्षा किंवा इतर वाहनांच्या तुलनेत ओला व उबरने प्रवास करणे थोडे सोपे असते. जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा या कारची ऑनलाईन बुकिंग करता येते. तसेच नागरिक किंवा प्रवाशांचा प्रवास गारेगार व्हावा म्हणून काही बस व ट्रेनमध्ये तसेच, ओला-उबरचीही वातानुकूलित (एसी सेवा)सेवा उपलब्ध असते.बंगळुरूमध्ये एक प्रवासी आणि उबर कॅब चालक यांच्यात एसी बिघडल्यामुळे शाब्दिक वाद झाला.नेमकं काय घडलं चला या लेखातून सविस्तर जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंगळुरूमध्ये एक प्रवासी आणि उबर कॅब चालक यांच्यात एसी बिघडल्यामुळे शाब्दिक वाद झाला.एक्स (ट्विटर) वर व्हिडीओ शेअर करत प्रवाशाने असा दावा केला की, सुरुवातीला त्याच्याशी हिंदीत बोलणाऱ्या चालकाचा अचानक संयम सुटला आणि नंतर त्याने कन्नडमध्ये बोलण्याचा आग्रह करण्यास सुरुवात करू लागला.

सुरवातीला अथर्व नावाचा प्रवासी कॅब चालकाच्या मित्राच्या इंडिकामध्ये बसण्यास नकार दिला. कारण – त्यात एसी नाही आणि ती अस्वच्छ सुद्धा होती. मग प्रवशाने या कॅबमध्ये बसण्याचे ठरवले.गाडीत बसल्यावर अथर्व यांनी सांगितले की, कॅब चालक फक्त त्यांच्याशी हिंदी भाषेत बोलत होता. पण, जेव्हा अथर्व यांनी कॅब चालकास एसी चालू करायला सांगितला तेव्हा मात्र चालकास राग आला. एसी चालू नाही आहे असे सांगत चालक कन्नडमध्ये बोलण्याचा आग्रह सुद्धा धरला. नेमकं काय घडलं व्हायरल व्हिडीओतून बघा.

हेही वाचा…VIDEO: ‘ओ सजनी रे…’ खाकी वर्दीतील सुरेल गळ्याचा कलाकार; पोलिसानं गायलेले ‘हे’ गाणे ऐकून नक्कीच व्हाल मंत्रमुग्ध!

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, प्रवासी जेव्हा एसी लावायला सांगितला म्हणून कॅब चालकास राग येतो. शेवटी जेव्हा ड्रायव्हर प्रतिसाद देत नाही तेव्हा प्रवासी म्हणतो, ‘एवढ्या छोट्या गोष्टीवरून तुम्हाला राग येत आहे.सर, तुम्हाला मला घेऊन जायचे नसेल तर तुम्ही मला येथे उतरवू शकता”. तेव्हा चालक अगदीच उद्धटपणे हिंदी, इंग्रही नाही केवळ कन्नड भाषेत बोलायचं असा आग्रह धरू लागतो.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @atharvdawar या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. घडलेला सर्व प्रसंग अथर्वने कॅप्शनमध्ये नमूद केला आहे आणि दोन व्हिडीओ सुद्धा शेअर केले आहेत. व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी सुद्धा या प्रकरणावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना व हा व्हिडीओ रिपोस्ट करताना दिसून आले आहेत.