Viral Video : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक प्रवासी आपले सामान घेऊन उभा असल्याचे दिसत आहे. पण, अचानक तो जमिनीवर जोरात कोसळतो. आजूबाजूच्या लोकांना काय झाले नेमकं समजत नाही. यावेळी सीआयएसएफच्या जवानांनी तातडीने धाव घेत प्रवाश्याचे प्राण वाचवले. सीपीआर देत त्यांनी प्रवाश्याला मृत्यूच्या दारातून परत आणले. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, सोशल मीडिया युजर्सदेखील या जवानांचे खूप कौतुक करत आहेत.

या घटनेत आंतरराष्ट्रीय विमानतळावरील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) पथकाने तातडीने एका प्रवाशाचे प्राण वाचवले. सीआयएसएफ जवानाने वेळीच सीपीआर देऊन प्रवाशाला मृत्यूपासून वाचवले. या व्हिडीओने सोशल मीडियावर लोकांची मने जिंकली आहेत.

Pakistan International Airlines Flight
पाकिस्तानच्या विमानाने तुम्ही कधी प्रवास केलाय का? प्रवाशाने शेअर केलेला Video पाहून तुमचीही झोप उडणार!
12th september rashi bhavishya राशी, राशिभविष्य, आजचे राशिभविष्य, राशीवृत्त देणार
१२ सप्टेंबर पंचांग: ‘आयुष्मान योग’ सिंह, कर्कसह ‘या’ राशींचे नशीब पालटणार? बक्कळ धनलाभ तर रखडलेली कामे पूर्ण होणार; वाचा तुमचे भविष्य
Maharashtra Kolhapur Mother Saves Son's Life, Attacked With Sword shocking CCTV
VIDEO: कोल्हापुरात आई समोरच मुलावर तलवारीने सपासप वार; पोटच्या गोळ्यासाठी आई हल्लेखोरांना भिडली, शेवटी काय झालं पाहा
Lion Fights With 20 Hyenas And 15 Vultures An Animal Video
झुंड में तो सूअर आते हैं, शेर अकेला आता है; १५ सेंकदात दाखवून दिलं स्वत:चं अस्तित्व; VIDEO पाहून झोप उडेल
Be careful while parking bike scooty on the road shocking video goes viral on social media
तुम्हीही रस्त्यावर तुमची बाईक, स्कूटी पार्क करुन जाता का? हा VIDEO बघून धक्का बसेल; पाहा तरुण थोडक्यात कसा वाचला
Bull hit the biker
खतरनाक! उधळलेल्या बैलाने बाईक चालकाला मारला धक्का, पुढच्या पाच सेकंदात जे घडलं; VIDEO पाहून उडेल थरकाप
Father daughter Viral video
पोलीस भरतीला गेली अन् बाहेर येऊन ढसाढसा रडू लागली; बाप-लेकीचा VIDEO व्हायरल, पाहा नेमकं काय घडलं?
Two young people doing stunts on the beach will get expensive see what exactly happened shocking video
“ताकदीचा माज इतकाही बरा नाही”; समुद्राच्या लाटेने तरुणाचं काय केलं पाहा; थरारक VIDEO व्हायरल

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, प्रवासी अर्शिद अय्युब २० ऑगस्ट रोजी श्रीनगरला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये चढत असताना अचानक जमिनीवर कोसळला. यानंतर त्याला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ANI ने घटनेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये अर्शिद सामान घेऊन उभा असताना अचानक जमिनीवर कोसळल्याचे दिसत आहे. यानंतर लोकांनी त्याला घेरले. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या सीआयएसएफच्या जवानांनी लगेच त्याला सीपीआर देण्यास सुरुवात केली, ज्यामुळे तो वाचला.

ANI ने एक्सवर पोस्ट करत लिहिले आहे की, CISF टीमने तत्परता दाखवली आणि अर्शिद अय्युबला वेळेत CPR देऊन जीवदान दिले. अर्शिद अय्युब हा मंगळवारी, २० ऑगस्ट रोजी सकाळी विमानतळाच्या टर्मिनल २ वरून श्रीनगरला जाणार होता. दरम्यान, त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो जमिनीवर कोसळला. यानंतर त्याला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read More Trending News : रेशनिंगच्या तांदळात तुम्हालाही आढळतायत प्लास्टिकसारखे दिसणारे तांदूळ? मग हा Video पाहाच

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी सीआयएसएफ जवानांचे कौतुक केले आहे. एका युजरने कमेंट केली की, “चांगले काम!! खूप कौतुक.” दुसऱ्या युजरने लिहिले, “चांगले काम. सीपीआरचे प्रशिक्षण संस्थांमध्ये आणि कार्यालयात, कारखान्यात किंवा कोणत्याही विभागात कार्यरत असलेल्या सर्व लोकांना दिले पाहिजे. जुलै महिन्यात एका महिला डॉक्टरनेही सीपीआर देऊन वृद्धाचे प्राण वाचवले होते.