Vande Bharat Express : देशभारत वेगवान आणि आरामदाई प्रवासासाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, या गाडीत मिळणाऱ्या सुविधेबद्दल आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसमधील निकृष्ट दर्जाच्या जेवणाची पुन्हा जोरदार चर्चा सुरु आहे. निमित्त ठरत आहे, ते म्हणजे व्हायरल होणारा एक फोटो. या गाडीतून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या जेवणात चक्क झुरळ सापडले. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये पाकीटबंद जेवण दिले जाते. यात हे एका चपातीमध्ये झुरळ सापडले. दरम्यान, संबधित प्रवाशाने याचा फोटो सोशल मिडियावर ट्विट केला आहे. त्याने मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मिळणाऱ्या खराब सेवा आणि जेवणाच्या दर्जाबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दरम्यान, ही घटना २४ जुलै रोजी घडली असून संबंधीत प्रवासी राणी कमलापती (हबीबगंज)- हजरत निजामुद्दीन वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करत होता. प्रवाशाने वंदे भारतमध्ये प्रवासादरम्यान आयआरसीटीसीकडून जेवण मागवले ज्यात ज्यूस आणि जेवणाचे दोन पाकीटं होती. त्यात चपाती आणि भाजी होती. प्रवाशाने यातील थोडी चपाती खाल्ली मात्र नंतर त्याने ही चपाती निरखून पाहिली असता त्यात मेलेले झुरळ आढळून आले.

Vande Bharat passenger finds insects in food, Railways slaps Rs 50000 fine on caterer
वंदे भारत प्रवाशाला अन्नात सापडले किडे, रेल्वेने केटररला ठोठावला ५० हजार रुपयांचा दंड
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
in pune katraj person with country made pistol arrested by Crime Branchs Anti Robbery Squad
पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड, कात्रज बाह्यवळण रस्ता परिसरात कारवाई
Crime case against the couple, couple pushed traffic police, traffic police,
वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा, कारवाई टाळण्यासाठी बनावट वाहन क्रमांकाची पाटी
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित

@IRCTCofficial टॅग करून आणि #Vandebharatexpress आणि #VandeBharat सारखे हॅशटॅग वापरून प्रवाशाने आपली निराशा व्यक्त ट्विटरवर व्यक्त केली आहे. तक्रारीची त्वरित दखल घेत, IRCTC ने प्रवाशाच्या PNR क्रमांकाची मागणी केली आणि प्रतिसाद दिला. “तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्हाला मनापासून खेद वाटतो. खात्री बाळगा, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य कारवाई केली जाईल.” असा रिप्लाय रेल्वेकडून देण्यात आला आहे.

पाहा फोटो

हेही वाचाVIDEO: खेळता खेळता ७ वर्षाच्या मुलीने चिमुकल्याला विहिरीत टाकलं; बचावासाठी ओरडत राहीला पण…

काही दिवसांपूर्वीच हैदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसमध्येही असाच खळबळजनक प्रकार घडल्याची माहिती समोर आली होती. जिथं प्रवाशाला देण्यात आलेल्या वड्यातून चक्क तेल गळत निथळत होतं. एकिकडून प्रवाशांना लज्जतदार जेवणाची, खाद्यपदार्थांची हमी देऊन त्यांचं लक्ष वेधणाऱ्या या रेल्वे विभागाकडून अशा चुका सातत्यानं होत असल्यामुळं आता प्रवाशांचाही संताप अनावर झाला आहे. तेव्हा रेल्वेकडून यावर कोणती कारवाई होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.