Gutkha stains in metro cause outrage : भारतातील अनेक लहान- मोठ्या शहरांमध्ये आता अत्याधुनिक मेट्रो ट्रेनची सेवा सुरु झाली आहे. कोलकत्ता, दिल्ली, मुंबई, अहमदाबादसह अनेक शहरांमधील हजारो प्रवासी दररोज मेट्रोतून आरामदायी प्रवासाचा आनंद घेतात. अगदी वेळेत धावणारी ही मेट्रो सेवा तिच्या स्वच्छतेसाठीही ओळखली जाते. मेट्रो स्थानकांवरही ठिकठिकाणी स्वच्छतेबाबत सुचना फलक लावण्यात आल्याचे दिसते. इतकेच नाही तर प्लॅटफॉर्मवरही स्वच्छता कर्मचारी दिवसभर राबताना दिसतात. असे असतानाही काही लोक या पायाभूत सुविधांचे नुकसान करण्याच्या प्रयत्नात असतात. नुकताच मेट्रोमधील एक असा फोटो व्हायरल झाला आहे जो तुम्ही युजर्सनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

या फोटोमध्ये कोणीतरी मेट्रो ट्रेनच्या दरवाज्यावर गुटखा खाऊन थुंकल्याचे डाग दिसत आहेत. जे पाहून युजर्स असे करणाऱ्या प्रवाशाविरोधात संताप व्यक्त करत कडक कारवाईची मागणी करत आहे. @GargaC नावाच्या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “गुटखाफिकेशन ऑफ मेट्रो, हा गुन्हेगार कोण आहे त्याचा शोध लावा.” मात्र हा फोटो नेमका कोणत्या शहरातील आहे हे सांगितले नाही.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हा फोटो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक युजर्सनी मेट्रोत गुटखा खाऊन थुंकणाऱ्या गुन्हेगारचा शोध घेत त्याला कडक शिक्षा करण्याची मागणी केली. तसेच सरकारी अधिकाऱ्यांना गुटखा कंपन्यांवर कारवाई करण्याचे आवाहन केले.

एका युजरने कमेंट केली की, “सरकारने गुटखा कंपन्यांना या गुन्ह्यासाठी दंड ठोठावायला सुरुवात करावी! खरं तर जबाबदारी आणि नागरी भावना तिथून सुरू होते. दुसरा एक युजर म्हणाला, हे पश्चिम बंगाल, बिहार, यूपी, मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान असू शकते, कोणतेही राज्य गुटखा मुक्त नाही, त्यामुळे यावर योग्य कारवाई करा, आणि व्यक्तिगत राजकारण करणे थांबवा. यासह सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हेगारावर दंड का ठेठावला जाऊ शकत नाही?

तिसऱ्या युजरने लिहिले की, “काही दिवसांपूर्वी सीएसएमटी स्टेशनच्या आत जमिनीवर थुंकताना एक व्यक्ती दिसली… त्याला विचारले की, तुम्ही स्टेशनची जमनला उघडी गटार समजत आहात का… सॅनिटेशन मार्शलने अशा लोकांना रोखले पाहिजे आणि १००० रुपये किंवा २००० रुपये दंड ठोठावला पाहिजे, जेणेकरून त्यांना किंमत मोजावी लागेल.

आणखी एक युजर म्हणाला, “जोपर्यंत गुन्हेगारांचे फोटो काढून त्यांना पोस्ट केले जात नाही आणि सार्वजनिकरित्या वावरताना त्यांना लाज वाटेल अशी वागणूक दिली जात नाही तोपर्यंत हे असेच चालू राहील. आम्हाला फक्त कठोर वागणूकच समजते. यावर आणखी एका युजरने म्हटले की, त्या व्यक्तीला शोधा आणि त्याला पुन्हा कोणतीही मेट्रोतून प्रवास करण्यास बंदी घाला.

Story img Loader