Garba Dance At Bengaluru Airport : विमानतळावर गेल्यानंतर प्रत्येकणज आपआपल्या बॅगा पकडून आपल्या विमानासाठी प्रतिक्षेत असलेले, तिकीट काउंटरवर उभा असलेले प्रवासी, चेकिंग करत असलेले कर्मचारी असंच काहीसं चित्र दिसून येतं. प्रत्येक जण आपआपल्या धुंदीत व्यस्त असलेले प्रवासी पाहून सुरूवातीला हे चित्र बोरिंग वाटू लागतं. पण नुकतंच बंगळुरू विमानतळावर काहीसं वेगळं चित्र दिसून आलं. या विमानतळावर प्रवासी चक्क गरब्यावर ठेका धरताना दिसून आलं. तरुणांपासून, सिनियर सिटीझन्सपर्यंत अनेक प्रवासी सारेच जण ‘ए हालो’ म्हणत गरबा डान्स करू लागले. हे दृश्य फारच आश्चर्यकारक होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सगळे प्रवासी गोल मोठं रिंगण करून गरब्याच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. काही प्रवाश्यांनी तर गरब्याचा पारंपारिक पोशाख परिधान केलेला दिसत आहे. अनेक महिला घागरा-चोलीमध्ये डान्स करताना दिसत आहेत. विमानतळासारख्या जागेवर जगण्याच्या रोजच्या रहाटगाडग्यात, केवळ एकमेकांकडे पाहणं इतकंच हातात राहातं. बधीर करणाऱ्या रूटीनमध्ये अडकलेल्या प्रवाश्यांना अचानक सरप्राईज करत हा गरबा डान्स सादर केला. गाण्यावर थिरकत जोशात नृत्याविष्कार तिथल्या तिथे सादर झाला. विमानतळासारख्या ठिकाणी केवळ चेकिंग आणि घड्याळ्याच्या काट्यावर धावणारे विमान आणि एक सेकंदही कुणासाठी थांबयला तयार नसणाऱ्या माणसांना या गरब्याने काही मिनिटे थांबायला भाग पाडले होते. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय.

आणखी वाचा : Navratri 2022 : न्यूयॉर्कमध्येही चढला गरब्याचा फिव्हर, टाइम्स स्क्वेअरवर महिलांच्या गरब्याचा VIDEO VIRAL

ट्विटर युजर दिव्या पुत्रेवूने हा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ पाहून लोकही आश्चर्यचकित होऊ लागलेत. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला साडे सहा हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. “बंगळुरूमध्ये काहीही होऊ शकतं म्हटल्यावर विश्वास ठेवा! @BLRAirport वर माझा @peakbengaluru क्षण पुन्हा आला. कर्मचार्‍यांचा विलक्षण प्रसंग! फक्त गरबा खेळण्यासाठी प्रवासी जमतात हे पाहून खूप आनंद होतो.” असं कॅप्शनमध्ये लिहित हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

आणखी वाचा : Navratri 2022 : मुंबई लोकल ट्रेनमधला गरबा पाहिलात का? हा VIRAL VIDEO तुम्हाला सुद्धा थिरकण्यास भाग पाडेल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर तरूणांनी केला गरबा डान्स; आनंद महिंद्रा म्हणाले, “गुजरातमधून माझा विरोध…

बेंगळुरू विमानतळाने ट्विटवर प्रतिक्रिया दिली की, “नमस्कार, उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद! BLR विमानतळ एक उत्कृष्ट प्रवासाचा अनुभव प्रदान करण्यात अग्रेसर राहण्याचा प्रयत्न करत आहे. आमचे प्रवासी या प्रयत्नांचे कौतुक करतात तेव्हा आम्हाला फार आवडतं!”

आणखी वाचा : Navratri 2022 : माजी पालकमंत्री आदिती तटकरे यांचा गरबा डान्स; पाहा Viral Video

या व्हिडीओवर गरबा प्रेमींचा उत्साह वाढविणाऱ्या प्रतिक्रियांचा देखील अक्षरशः पाऊस पडतोय. एकाने लिहिले, “नम्मा बंगळुरू अनेक संस्कृतींचा एक मेल्टिंग पॉट,” दुसर्‍याने लिहिले, “लव्ह द व्हाइब्स!” तिसर्‍याने कमेंट केली, “येथे काहीही होऊ शकतं आणि म्हणूनच आम्हाला बंगळुरू आवडतं!”