मुंबई लोकलनं प्रवास करणं सोपं नाही. लोकलला इतकी गर्दी असते की मुंगीलाही डब्यात शिरता येणार नाही. याच गर्दीतून मुंबईकर रोज आपला जीव धोक्यात घालून प्रवास करत असतात. तुम्ही मध्य, हार्बर, पश्चिम अथवा ट्रान्सहार्बर असा कोणताही पर्याय निवडा. तुम्हाला खचाखच भरलेली गर्दी अनुभवावी लागणारच. त्यातही जर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी प्रवास करत असाल तर अधिकच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कर्जत आणि बदलापूर येथील प्रवाशांमधला वाद नवीन नाही. बदलापूरकरांनी ‘आमच्या’ ट्रेनमध्ये चढू नये, असा कर्जतकरांचा तोरा असतो. तर बदलापूरवासी मात्र नेटाने उड्या टाकत लोकल पकडतात. नेहमीचा वाद मंगळवारी टोकाला गेला आणि बदलापूर रेल्वे स्थानकावरच मोठा गोंधळ उडाला.याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सर्वच संताप व्यक्त करत आहेत. बदलापूर रेल्वे स्थानकावर मंगळवारी सकाळी ७.५१ मिनिटांनी कर्जतहून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलच्या एका डब्याचे दोन्ही दिशेचे दरवाजे आतील प्रवाशांनी बंद केले होते. त्यामुळे बदलापूरमधील प्रवाशांची गैरसोय झाली व लोकलला उशीरही झाला.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिलांनी सेकंड क्लासमधले दरवाजे बंद केले आहेत. काही महिला दरवाजा उघडा असं सांगत आहेत मात्र दरवाजाजवळ उभ्या असलेल्या महिला काही एकायचं नाव घेत नाहीत. प्रवासी ओरडत असतानाही लोकलमधील प्रवासी त्यास प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे बदलापूरच्या प्रवाशांचा संताप वाढू लागला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ‘शिकार करो या शिकार बनो’ वाघ्या कुत्रा बिबट्याला भिडला; घाबरुन ठोकली धूम, घटना CCTV मध्ये कैद

महिलांवर गुन्हा दाखल

रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणामुळे कर्जत-सीएसएमटी ७.५१ च्या लोकलला दहा मिनिटांचा विलंब झाला असून संबंधित प्रवाशांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन कायमच खचाखच भरलेली असते. मुंबईच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी लोकल ट्रेन सर्वात कमी खर्चिक पर्याय आहे. त्यामुळे शेकडो नागरिक ट्रेननेच प्रवास करतात. मात्र आता लाइफलाइनचा हा प्रवास जीवघेणा ठरत चालला आहे.

मुंबई लोकलचं वास्तव

लोकल ट्रेनमधून रोज जवळपास ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. मध्य हार्बर पश्चिम मार्गावरुन जाणार्‍या लोकल रेल्वे गाड्या सकाळी आणि संध्याकाळी प्रवाशांनी गच्च भरलेल्या असतात. त्यामुळे नाईलाजाने काही प्रवासी लोकल रेल्वेच्या दरवाज्यात लटकून प्रवास करतात तर काही तरुण स्टंट म्हणून रेल्वेच्या टपावरुन प्रवास करतात. त्यामुळे या जिवघेण्या रेल्वे प्रवासात अनेक अपघात होऊन नागरिकांचा जीव जातो