Viral Video: भारतीय रेल्वे आणि गर्दी हे आता एक समीकरण झालं आहे. रेल्वेतील गर्दीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. आपल्यातील अनेक जण घरी जायला उशीर होऊ नये म्हणून, तर ऑफिसात वेळेत पोहचावे म्हणून, तर प्लॅटफॉर्मवर ट्रेन आली म्हणून धावत, प्रवाशांनी भरलेल्या ट्रेनमध्ये चढण्याचे साहस करतात. पण, हे धाडस आपल्या किंवा इतरांच्या जीवावर बेतू शकतं हे बहुधा अनेक जण विसरूनच जातात. तर आज सोशल मीडियावर काही प्रवाशांनी तर हद्दच केली आहे. त्यांनी रेल्वेच्या दोन डब्यांमधील कपलिंगवर (couplers) चढून धोकादायक प्रवास करण्याचा प्रयत्न केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ बिहारचा आहे. रेल्वे स्थानकावरील ट्रेन बिहारवरून पंजाबच्या अमृतसरला जात असते. पण, यादरम्यान रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ दिसत आहे. आधीच खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये अनेक जण चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. रेल्वे स्थानकावर गाडी थांबली आहे आणि काही प्रवासी कपलिंगवर चढून धोकादायक प्रवास करताना दिसून आले आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवास करणाऱ्या या प्रवाशांचा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…AirPods चोरी होऊ नये म्हणून लढवली शक्कल; अ‍ॅपलच्या ऐवजी लावला चक्क ‘या’ कंपनीचा लोगो… पाहा पोस्ट

व्हिडीओ नक्की बघा…

व्हिडीओची सुरुवात रेल्वेच्या जनरल डब्याच्या फुटेजने होते आहे. अनेक प्रवासी ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यात अनेक जण दरवाजाच्या हँडलवर लटकले आहेत तर काही जण दोन डब्यांमधील कपलिंमधून ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहेत. तर अनेक जण ट्रेनच्या दारापाशी उभे राहून जीवघेणा प्रवास करत आहेत. तर काही प्रवासी रेल्वे स्थानकावर उभे राहून आपल्याला ट्रेनमध्ये जाता येईल का याचा विचार करताना दिसत आहेत. बिहार रेल्वे स्थानकावरील हे गोंधळलेले दृश्य दैनंदिन प्रवाशांना भेडसावणाऱ्या आव्हानांचे चित्रे अधोरेखित करते आहे असे म्हणायला हरकत नाही .

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @mr.vishal_sharma_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत. तसेच या व्हायरल व्हिडीओने भारतीय रेल्वेमध्ये गर्दी व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांची तातडीची गरज अधोरेखित केली आहे आणि असंख्य प्रवाशांच्या सुरक्षिततेवर आणि आरोग्यावर परिणाम करणाऱ्या गंभीर समस्येवर प्रकाश टाकला आहे ; जो तुम्हालाही विचार करायला नक्कीच भाग पाडेल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passengers desperately trying to board an already packed train at the end they jumping onto coupler at station watch ones asp
Show comments