Plane Crash Viral Video: इंटरनेटवर दररोज एकापेक्षा एक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी कधी काही व्हिडिओ आपल्याला खळखळून हसवतात, तर कधी काही व्हिडिओ अंगावर काटा आणणारे असतात.. नुकताच असाच एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे, जो तुमचे मन हेलावेल. विमान अपघाताच्या या भयावह व्हिडीओमध्ये दुर्घटना होण्याच्या काही सेंकद आधी प्रवाशांनी विमानातून उडी मारून आपला जीव वाचवला आहे. हे दृश्य व्हिडीओमध्ये कैद झाले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

विमानाचा अपघात होण्यापूर्वी प्रवाशांनी मारल्या उड्या

व्हिडिओमध्ये एक विमान शहरी भागातून उडताना दिसत आहे. दरम्यान, खाली उभे असलेले लोक ते पाहत आहेत आणि काही व्हिडिओ शुट करत आहेत विमाम जेव्हा अचानक खूप खाली येते आणि तलावावरून जात असते तेव्हा विमानातील प्रवासी पॅराशूटच्या साहाय्याने खाली उडी मारताना दिसतात. विमानातून स्वतःला कसे बाहेर काढता येईल याचा प्रयत्न करताना ते दिसत आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करणारे लोक हे पाहून थक्क झाले आहेत. दरम्यान, विमानातून उडी मारताना पाहून व्हिडिओ बनवणारे लोक जोरजोरात ओरडत आहेत. पण काही समजण्याआधीच एक मोठा स्फोट झाला आणि आगीच्या ज्वाळांसह धुराचे प्रचंड लोट हवेत उठू लागले. विमानाचा थरारक अपघात व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

थोडक्यात वाचला प्रवशांचा जीव

हा व्हिडिओ X वर @interesting_aIl नावाच्या खात्यावर शेअर करण्यात आला आहे. ४८सेकंदांचा हा भितीदायक व्हिडिओ आतापर्यंत १६.७ दशलक्ष लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहणाऱ्या एका यूजरने लिहिले की, “उडी मारलेल्या सर्व लोकांपैकी २ लोकांचे प्राण वाचू शकले नाहीत.” दुसऱ्या यूजरने विचारले की, “त्यांना कसे कळले की विमान क्रॅश होणार आहे.” तिसऱ्या यूजरने लिहिले, “असे दिसते की काही लोक पॅराशूट उघडू शकले नाहीत.”

Story img Loader