SpiceJet Flight Viral Video : इंडिगोच्या इस्तंबूल-दिल्ली फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने हवाईसुंदरीसोबत गैरवर्तणूक केली होती. तसेच एअर इंडिया विमानात एक मद्यधुंद व्यक्तीने महिलेवर लघुशंका केल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला होता. सोशल मीडियावर या गंभीर घटना व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. ही प्रकरणं ताजी असतानाचा आता पुन्हा एकदा एका हवाईसुंदरीसोबत प्रवाशाने हुज्जत घातल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

स्पाईसजेट विमानात ड्यूटीवर असलेल्या एका हवाईसुंदरीसोबत प्रवाशाने अर्वाच भाषेत भांडण केलं. दिल्ली-हैद्राबादच्या स्पाईस जेट विमानात दिल्ली विमनातळावर हा धक्कादायक प्रकार घडला. विमानातील हा व्हिडीओ एएनआयने ट्विटरव शेअर केला आहे. हवाईसुंदरीसोबत वादविवाद करणाऱ्या दोन प्रवशांना सुरक्षारक्षकांच्या ताब्यात देण्यात आलं. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला.

Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : कुर्ल्यात बस आदळल्यानंतर चालक संजय मोरेंनी असा काढला बसमधून पळ; VIDEO व्हायरल!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Kurla accident case CCTV from bus seized Mumbai news
कुर्ला अपघात प्रकरणः बसमधील सीसीटीव्ही ताब्यात, २५ जणांचा जबाब नोंदवला
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
mobile transport officer stolen Mumbai, mobile stolen Mumbai,
मुंबई : वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी परिवहन अधिकाऱ्याचा मोबाइलच पळवला
drone spray services for farmers drone spraying pesticides for agriculture
कृषी ड्रोन : अर्थार्जनाचा नवीन मार्ग
Kandalvan, drone filming, flamingos, Mumbai,
मुंबई : फ्लेमिंगोच्या ड्रोन चित्रिकरणाच्या प्रकरणाची कांदळवन कक्षाची चौकशी सुरू

नक्की वाचा – भर रस्त्यात बाईकवर एकमेकांना मिठी मारून किस केलं, Video व्हायरल होताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

इथे पाहा व्हिडीओ

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली विमानतळावर हैद्राबाद-दिल्ली स्पाईस जेट विमानात प्रवशाने हवाईसुंदरीसोबत वादविवाद केला. एक ज्येष्ठ नागरिक हवाईसुंदरीवर जोरजोरात ओरडत असल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं. दिल्ली विमानतळावर ही हा धक्कादायक प्रकार घडला. दोन प्रवाशांचा विमान प्रवास रद्द करून त्यांना विमानतळावरील सुरक्षारक्षकांच्या ताब्यात दिलं.

Story img Loader