Viral video: ट्रेन असो वा मेट्रो, लोक कधी कधी सीटसाठी भांडत असतात. त्याचे व्हिडीओही व्हायरल होतात. ऑफिसला जाण्यासाठी मेट्रोमध्ये चांगलीच गर्दी असते अशा वेळीही सीटसाठी भांडणे होतात. काही लोकतर बसण्याच्या जागेवर बॅग्स आणि इतर सामान ठेवतात आणि त्यामुळे इतर प्रवाशांशी भांडणे होतात. असाच एक भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मेट्रोमध्ये सीटवर बसण्यावरुन एका महिलेचं काही प्रवाशांबरोबर तुफान भांडणं झाले. हा भांडणाचा व्हायरल व्हिडिओ आता जोरदार चर्चेत आहे. चला तर नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया…
हाणामारीच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. आपण सोशल मीडियावर महिला, तरुणींच्या फ्री स्टाइल हाणामारीचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये महिला एक तरुण आणि एका व्यक्तीसोबत भांडताना दिसत आहेत. दोघंही एकमेकांना ओढत आहेत, आजूबाजूच्या लोकांनी भांडण शांत करण्याचा खूप प्रयत्न केला, पण कोणीही मागे हटायला तयार नव्हते. एका महिलेने तर सर्व मर्यादा ओलांडून शिव्या द्यायला लागली. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिला भांडताना दिसत आहेत. मात्र या वादविवादाचे कारण नेमके काय आहे हे समजू शकलेले नाही.
एकूणच ही घटना अत्यंत विचित्र आणि धक्कादायक आहे. मेट्रोमध्ये तुमचं कोणाशी भांडण झालं तर लगेच रेल्वे पोलिसांना कळवावं. कारण या प्रकरणात सर्व अधिकार रेल्वे पोलिसांकडे आहेत. दिल्ली मेट्रोमधील भांडणाचे आणि मारामारीचे सत्र वाढतच चालले आहे. गेल्या काही दिवसांपासून मेट्रोमध्ये झालेल्या मारामारीचे आणि भांडणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.फ्री स्टाईल हाणामारी झाल्यानंतर इतर प्रवाशांमध्ये एकच भीती पसरल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. तर काही जण हाणामारी थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.याचबरोबर आरोपी प्रवाशांवर कारवाई केली पाहिजे, असेही प्रवाशांचं म्हणणं आहे. हाणामारीच चा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं लिहिलं असं काही की वाचून होईल आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा
नेटकरी संतापले
हा व्हिडीओ सोशल मीडियावर एक्सवर gharkekalesh नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. नेटकऱ्यांनीही यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय की, “या महिलेला हात उचलायची गरज नव्हती” आणखी एकानं “अशाप्रकारे महिलेनं शिव्या द्यायची गरज नव्हती” अशी प्रतिक्रिया दिली आहे.