Indian Railway Jugaad Video : ट्रेनमधून लांबपल्ल्याच्या प्रवासादरम्यान लोक वेळ घालवण्यासाठी अनेकदा काही ना काही आयडिया वापरत असतात. तु्म्हीही प्रवासादरम्यान पाहिले असेल की, लोक वेळ जात नाही म्हणून मोबाइलमध्ये टाइमपास करत असतात, तर कुणी गाणी ऐकताना दिसतात. यात काही मोबाइल किंवा लॅपटॉपवर चित्रपट बघत असतात. पण, नुकत्याच एका व्हायरल झालेल्या व्हिडीओत एका प्रवाशाने ट्रेनमधून प्रवास करताना मनोरंजनासाठी असा एक देशी जुगाड केला आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका प्रवाशाने जुगाडच्या मदतीने चालत्या ट्रेनमध्ये थिएटरची मज्जा घेतली आहे. आता तुम्हीही विचार करत असाल की हे कसे होऊ शकते, पण हे तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यानंतरच कळेल.
ट्रेनमध्ये बनवलं स्वतःच थिएटर
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती प्रोजेक्टर आणि पांढऱ्या चादरीच्या साहाय्याने चालत्या ट्रेनमध्ये त्याच्या सीटची जागा एका छोट्या मूव्ही थिएटरमध्ये बदलताना दिसत आहे. यासाठी त्याने चालत्या ट्रेनमध्ये सिनेमाचा पडदा म्हणून पांढऱ्या रंगाच्या चादरीचा वापर केला. यानंतर प्रवाशाने प्रोजेक्टर ट्रॅव्हलचा वापर करून त्यावर सिनेमा सुरू केला, जो सीट्सवर झोपलेले प्रवासी अगदी आनंदात बसून पाहत होते. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी म्हटले की, वाह क्या बात है.
@anju.singh_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘अशा प्रकारे आम्ही एकत्र प्रवास करतो.’ आता व्हिडीओ पाहणारे लोक त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.