“आयुष्यात कितीही समस्या आल्या तरी हार मानू नका. यशस्वी व्हायचं असेल तर प्रतिकूल परिस्थितीत लढायला शिका. तरच तुम्हाला अपेक्षित यश मिळून शकतं.” असा संदेश देणारा एक व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. तुमच्यात जिद्द व जाळ असेल तर काहीही यश मिळवण्यापासून तुम्हाला थांबवू शकत नाही. तुमच्याकडे पॅशन असेल तर भाषा कधीच आड येणार नाही. हे नाशिकमधल्या एका जोडप्यानं प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवलंय. या जोडप्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तेजीने व्हायरल होतोय.
फूड ब्लॉगर स्ट्रीट फूड रेसिपीजने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या जोडप्याला ऐकूही येत नाही आणि बोलताही येत नाही. पण तरीही अगदी परफेक्ट पद्धतीने हे जोडपे पाणीपुरीचा स्टॉल चालवतात. आता तुम्ही म्हणाल, मग इथे आलेल्या ग्राहकांना काय हवंय ? पाणीपुरी की शेवपुरी? तिखट की गोड? हे कसं कळतं? तर हे जोडपं ग्राहकांशी इशाऱ्याने संवाद साधतात. त्यांच्या ग्राहकांना जे काही देतात ते पुरीसहित अगदी घरगुती असतं.
हा व्हिडीओ शेअर करताना एक कॅप्शन देखील लिहिली आहे. “हे पाहून तुमचं मन पिघळून जाईल आणि चेहऱ्यावर स्माईल येईल 🙂 नाशिकमध्ये एका मुक-बधिर जोडप्याने अपंगत्वावर मात करून एक छोटासा पाणीपुरीचा स्टॉल चालवला आहे. ते जे काही देतात ते घरच्या घरी बनवतात, अगदी पुरीसुद्धा. मला खरोखर आवडलं. जेवण देताना ते स्वच्छता राखतात. हे जोडपे खरे टॅलेंटेड आहेत, आमच्या पिढीने या जोपड्यांकडून शिकवण घेतली पाहिजे आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे. स्थान: जत्रा हॉटेलजवळ, आडगाव नाका, नाशिक.”
शरीराचा एखादा अवयव दुखू लागला की आपण लगेच कामावर सुट्टी घेतो. काही दिवस तर अंग दुखतंय म्हणून तक्रार करत दिवस घालवतो. पण या जोडप्यांचं कर्तृत्व पाहून सारेच जण थक्क झाले आहेत.
आणखी वाचा : Same to same! जुळ्या बहिणींचा नवराही एक आणि आता प्रेग्नेंसीबाबत काय म्हणतात? वाचा…
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : कोमोडो ड्रॅगनने कासवाची केली शिकार, त्याचे कवच टोपीसारखं घालून फिरू लागला
हा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात पाहत आहेत. एकदा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याचा मोह लोकांना आवरता येत नाहीये. हा व्हिडीओ बघता बघता इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ३.७ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर ४ लाख १५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी या जोडप्याच्या मेहनतीचं कौतूक केलंय. तर काहींनी यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचं सांगितलं.