बुधवारपासून चर्चा सुरू आहे ती पठाण सिनेमाची. गेल्या दोन दिवसात शाहरुखच्या पठाणने १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. अशात पठाण सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. Pathaan हा सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर हाणामारी झाली. उत्तर प्रदेशातल्या अमरोहामध्ये ही घटना घडली. सिनेप्लेक्स या मॉलमधले प्रेक्षक एकमेकांना भिडले.
नेमका काय घडला प्रकार?
अमरोहा येथे माधौ सिनेमा हॉलमध्ये पठाण सिनेमाचा शो लागला होता. हा सिनेमा पाहण्यासाठी आलेले काही प्रेक्षक एकमेकांना भिडले. गुरूवारी शेवटचा शो पाहण्यासाठी गर्दी झाली होती. सुरक्षेचे नियम पाळले गेले नव्हते. तिकिटं घेऊन लोकं सिनेमा पाहण्यासाठी गेले. मात्र नंतर दोन गटांमध्ये कोल्ड ड्रिंकवरून आधी बाचाबाची झाली. त्यानंतर लाठ्या काठ्यांनी मारहाण झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायर होतो आहे.
सिनेमा हॉलच्या मॅनेजरने काय सांगितलं?
माधौ सिनेप्लेक्सचे मॅनेजर अब्दुल हाई यांनी सांगितलं की गुरूवारी रात्री थिएटरमध्ये कोल्ड ड्रिंकच्या बाटल्या संपल्या होत्या. एकच कोल्डड्रिंक होती. यावरून दोन गटांमध्या मारामारी झाली. त्यानंतर बाचाबाची, शिवीगाळ आणि नंतर हाणामारी झाली. लाठ्या काठ्या घेऊन दोन गट एकमेकांना भिडले. गली न्यूजने या संदर्भातला व्हिडिओ पोस्ट केला आहे.
पोलिसांनी या प्रकरणात दोघांना केली अटक
पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. सिनेप्लेक्सच्या कर्मचाऱ्यांनी चारजणांना अटक केली गेली आहे असा दावा केला आहे. आज तकने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. पठाण सिनेमातल्या बेशरम रंग या गाण्यावरून चांगला वाद झाला होता. त्यानंतर बॉयकॉट पठाण हा ट्रेंडही सुरू झाला होता. अशात हा सिनेमा फार चालणार नाही अशीही चर्चा होती. मात्र सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. शाहरुख खान, दीपिकाच्या पठाणने दोन दिवसात १०० कोटींची कमाई केली आहे.