Besharam Rang Song Viral video: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणचा पठाण सिनेमा २५ जानेवारी २०२३ ला प्रदर्शीत होणार आहे. सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच त्यांच्या बेशरम रंग गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. दीपिकाचा या सिनेमातील बोल्ड अंदाज पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण दीपिकाचा असा बोल्ड अंदाज तु्म्ही याआधी कधी पाहिला नसेल. दिल्लीपासून गल्लीपर्यंत या गाण्याचं वेड तरुणांना लागलेलं दिसतंय. कारण एका बीटीएस ग्रुपने बेशरम गाण्यावर भन्नाट डान्स केला असून व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. एकीकडे पठाण सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला असतानाच दुसरीकडे मात्र बेशरम गाण्यावर तरुण मुलं थिरकताना दिसत आहेत. बीटीएस ग्रुपच्या तरुणांचा बेशरम रंग गाण्यावर अफलातून डान्स केलेला व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवर या व्हिडीओला @qualiteaposts नावाच्या युजरने शेअर केला आहे. हा व्हिडीओ बीटीएस ग्रुपमध्ये असलेल्या तरुणांचा जुना व्हिडीओ आहे. या व्हिडीओला युट्यूबवर लाखो नेटकऱ्यांनी पाहिलं आहे. पण आता या व्हिडीओला पठाण सिनेमातील बेशरम रंग गाण्याचे बोल देऊन चांगल्या पद्धतीत एडिट करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओनं अनेकांचं लक्ष वेधलं आहे. तरुणांचा या व्हिडीओतील डान्स पाहून अनेक जण थक्क झाले आहेत. कारण जबरदस्त डान्स स्टेप्स करत तरुणांनी हा व्हिडीओ बनवला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून आतापर्यंत ४ लाखांहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत.

नक्की वाचा – Video: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा हा ‘खलनायक’ कोण आहे? ‘चोली के पीछे क्या है’ गाण्यावर तरुणाने केला भन्नाट Belly Dance

इथे पाहा व्हिडीओ

गावाकडचा पठाणही बेशरम रंग गाण्यावर थिरकला होता

इथे पाहा व्हिडीओ

दीपिका आणि शाहरुखची सिझलिंग केमेस्ट्री पाहून तमाम चाहत्यांच्या मनाला भूरळ पडली आहे. बेशरम सॉंग दिवसेंदिवस लोकप्रीय होत आहे. गाण्यात असलेला बोल्ड अंदाज पाहून काही तरुणांना याच गाण्यावर थिरकण्याचं वेड लागलं आहे. याआधीही एका तरुणाने दीपिकाने केलेल्या दिलखेचक अदा जशाच्या तशा कॅमेरासमोर करण्याचा प्रयत्न केला होता. या तरुणासोबत त्याचे मित्रही जबरदस्त ठुमके लगावताना या व्हिडीओत दिसत आहेत. तरुणाने बेशरम रंग या गाण्यावर रिक्रिएट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओनं नेटकऱ्यांना आकर्षीत केलं असून भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही या व्हिडीओवर होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pathan movie besharam rang song bts group dance edited video goes viral on internet sharukh khan deepika padukon pathan movie update nss