Agra Husband Caught Wife With Lover : पती-पत्नी और वो…अशाच एका प्रकरणाचा व्हिडीओ सध्या चर्चेत आलाय. नवऱ्याला संशय आल्याने तो बायकोचा पाठलाग करत होता. हायवेवर त्याची बायको तिच्या बॉयफ्रेंडसोबत स्कूटीवरून जाताना दिसली. बायकोला पाठलाग करत असताना स्कूटीवर त्यांची एक छोटीशी चिमुकली सुद्धा होती. आईला असं दुसऱ्या कुणासोबत जाताना पाहून वडिलांसोबतच मुलीलाही धक्का बसला. स्कूटीवर बसलेल्या पतीच्या ओळखीच्या व्यक्तीने सर्व या प्रकरणाचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. नवऱ्याने बायकोला रंगेहाथ पकडलं आणि हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण आग्रा इथल्या सिकंदरा पोलीस ठाण्याचे आहे. या प्रकरणात एक महिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरत होती. हा प्रकार नवऱ्याला समजताच त्याने बायकोला रंगेहात पकडण्याचा कट रचला. त्यांची मुलगी आणि आणखी एकाला स्कूटीवर बसवले. या घटनेच्या व्हायरल व्हिडीओमध्ये बायको दुसऱ्या पुरुषासोबत स्कूटीवरून जाताना दिसत आहे. महिलेचा नवरा स्कूटीवरून तिच्या मागे मागे येतो आणि तिच्या बरोबरीने पोहोचतो. तिच्या बरोबरीने गाडी आल्यानंतर बायकोला गाडी थांबवायला सांगतो.
आणखी वाचा : बॉनेट उघडून कार दुरुस्त करत होता, गाडी आपोआप पुढे आली आणि पुढे काय घडलं? पाहा VIRAL VIDEO
मुलीसोबत हायवेवर गाडी चालवताना नवरा जोरजोरात ओरडतो. रस्त्यावरून जाणारेही लोकही घटनास्थळी जमा झाले. भरधाव वेगाने स्कूटी चालवत नवऱ्याने आपली स्कूटची आडवी करत बायको आणि तिच्या बॉयफ्रेंडची स्कूटी थांबवली. यावरून दोघांमध्ये भांडण झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर मारहाण, भांडण, शिवीगाळ सुरू झाल्या. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ महिलेच्या पतीसोबत आलेल्या एका व्यक्तीने बनवला असल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कारवाई केली. यापुढेही असे काही घडल्यास अन्य कारवाईही होऊ शकते, असा इशाराही दिला.
आणखी वाचा : दिव्यांग मुलाला ट्रेनमध्ये चढण्यासाठी मदत करणाऱ्या आरपीएफ अधिकाऱ्याचा VIDEO VIRAL
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : ज्वालामुखीतून लाव्हा बाहेर पडत होता अन् लोक स्माईल देत सेल्फी काढत होते…
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे १० वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि तिला एक मुलगीही आहे. असे म्हटले जाते की, विवाहित असूनही या महिलेचे एका तांदूळ व्यापाऱ्याशी संबंध होते, ज्याच्यासोबत ती स्कूटीवरून जात होती. या कारणावरून पती-पत्नीमध्ये अनेकवेळा घरगुती वाद झाले. मात्र आदल्या दिवशी महिला कोणतेही कारण न देता घराबाहेर पडल्यावर पतीनेही तिचा पाठलाग करून तिला रंगेहाथ पकडले.