Saxophone Performance During Brain Surgery: जर एखाद्या व्यक्तीचे ऑपरेशन असेल तर त्याला विश्रांती दिली जाते, विशेषत: जेव्हा मेंदूसारख्या संवेदनशील अवयवाचे ऑपरेशन केले जाते तेव्हा ते अधिक गुंतागुंतीचे असते. पण इटलीतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे डॉक्टरांनी रुग्णाच्या ब्रेन ट्यूमरवर शस्त्रक्रिया केली आणि शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाने चक्क सेक्सोफोन वाजवला. धक्कादायक बाब म्हणजे ही शस्त्रक्रिया तब्बल नऊ तास चालली. जीझेड नावाच्या ३५ वर्षीय रुग्णावर रोमच्या पेडिया इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्या रुग्णाला डिस्चार्ज देखील देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑपरेशन दरम्यान जागे ठेवणे गरजेचे

हे प्रकरण रोमच्या पेडिया इंटरनॅशनल हॉस्पिटलमधील असून येथे एक पेशंट दाखल झाला होता जो संगीतकार आहे. त्याच्या मेंदूमध्ये गाठ होती आणि डॉक्टर ती ऑपरेशन करून काढणार होते. मात्र यादरम्यान डॉक्टरांनी असा निर्णय घेतला की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. डॉक्टरांनी सांगितले की ऑपरेशन दरम्यान आम्हाला रुग्णाला जागे ठेवावे लागते, जेणेकरून आम्हाला रुग्णाच्या मेंदूच्या नसांना नुकसान होणार की नाही हे कळेल.

( हे ही वाचा: Viral Video: महिलेचा देसी जुगाड! प्रवासासाठीचे सर्व सामान तिने एकाच बॅगेत कसे भरले ते एकदा पाहाच)

पेशंट तब्बल नऊ तास सेक्सोफोन वाजवत राहिला

डॉक्टरांच्या पथकाने ऑपरेशन सुरू केले आणि ते पूर्ण नऊ तास चालले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या काळात रुग्ण संपूर्ण नऊ तास सेक्सोफोन वाजवत राहिला. हॉस्पिटलमधील एक व्हिडिओ जगभरात व्हायरल होत आहे. यामध्ये रुग्ण ऑपरेशन थिएटरमध्ये बेडवर पडून सेक्सोफोन वाजवत असून त्याच्यामागे डॉक्टर मेंदूची शस्त्रक्रिया करत आहेत.

येथे पाहा व्हिडिओ

( हे ही वाचा: CCTV: चक्क पोलीसानेच केली चोरी! बंद दुकानाबाहेरील बल्ब चोरल्याच्या घटनेने उडाली खळबळ; पाहा Viral Video)

एका निवेदनात, जीझेडने सांगितले की, त्याच्या मेंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान त्याला भीती वाटण्याऐवजी शांतता वाटत होती. त्याने सेक्सोफोन वाजवताना १९७०च्या काळातील ‘लव्ह स्टोरी’ चित्रपटातील तीन गाणी वाजवली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patient plays saxophone during his brain tumor surgery successfully by doctor in italy gps