Viral Video : सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की पोट धरुन हसायला येते.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक रुग्ण चक्क डॉक्टरांना भूत समजते आणि जोरजोराने ओरडायला सुरुवात करते. रुग्णाचा हा मजेशीर व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डॉक्टर आणि रुग्णाचे नाते हे अनोखे असतात. रुग्णांची काळजी घेऊन डॉक्टर त्यांच्या मनात आपले स्थान निर्माण करतात. सोशल मीडियावर डॉक्टर आणि रुग्णांचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण असा व्हिडीओ तुम्ही पहिल्यांदाच पाहिला असेल. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला सुद्धा हसू आवरणार नाही.

हा व्हायरल व्हिडीओ एका हॉस्पिटलमधील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की हॉस्पिटलच्या एका वार्डमध्ये दोन रुग्ण बेडवर झोपून आराम करत आहे. अचानक तिथे पीपीई किट घालून एक डॉक्टर चेकअपला येतात आणि एका रुग्ण महिलेकडे जातात पण पीपीई किटमध्ये घातलेल्या डॉक्टरांना पाहून ही महिला रुग्ण अचानक उठते आणि जोरजोराने ओरडायला सुरूवात करते.

हेही वाचा : आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने जगा! झाडाच्या फांदीला लटकून आजोबा घेताहेत झोका, व्हिडीओ पाहून आठवेल तुम्हाला तुमचे बालपण

या महिलेला वाटते की तिच्यासमोर भूत आहे. त्यामुळे कोणताही विचार न करता ओरडायला सुरुवात करते. या महिलेचा आवाज ऐकून बाजूच्या बेडवर झोपलेला रुग्ण सुद्धा धाडकन जागा होतो.पण नंतर डॉक्टर त्या महिलेला प्रेमाने समजावून सांगतात की ते डॉक्टर असून त्यांनी पीपीई किट घातली आहे. तेव्हा कुठे ही महिला शांत बसते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही खूप हसू येईल.

surgeonatwork या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “रुग्णाला वाटले की डॉक्टर भूत आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “दुसरा रुग्ण कोमातून उठला” तर एका युजरने लिहिलेय, “तिला वाटले की यमराज आपल्याला घ्यायला आले आहेत” आणखी एका युजरने लिहिलेय, “मी या रुग्णाला दोष देणार नाही.”