Patna Porn Video Incident Update: बिहारची राजधानी पाटणा येथील रेल्वे स्टेशनवर अचानक पॉर्न व्हिडीओ लागल्याची धक्कादायक घटना सध्या चर्चेत आहे. यावर चक्क पॉर्नस्टार केंड्रॉ लस्टने ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. तिचे हे ट्वीट सुद्धा आता व्हायरल झाले आहे. पॉर्नस्टारने ट्वीटमध्ये फक्त एक शब्द (इंडिया) लिहिला होता आणि हॅशटॅग #BiharRailwayStation असे लिहिले होते. पण खरी प्रतिक्रिया तर कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळाली. तिचे हे ट्वीट ३. ५ लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले आणि भारताबद्दल बोलल्यावर अर्थात भारतीय ट्विटर युजर्सनी कमेंट बॉक्स भरून टाकला होता. नेमका हा प्रकार काय होता, चला पाहूया…
रेल्वे स्टेशनवर पॉर्न हे प्रकरण काय? (Patna Porn Video Incident)
पाटणा रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांच्या सोयीसाठी लावण्यात आलेल्या एलईडी स्क्रीनवर अचानक पॉर्न व्हिडिओ चालू झाला त्यामुळे प्रवाशांमध्ये अचानक गोंधळाच वातावरण निर्माण झालं. धक्कादायक बाब म्हणजे हा व्हिडीओ तब्बल ३ मिनिटे चालू होता. याप्रकरणी प्रवाशांनी तक्रार दाखल केल्यानंतर भारतीय रेल्वेने सबंधित कंपनीवर कठोर कारवाई केली आहे.
नेटकऱ्यांची प्रतिक्रिया
केंड्रॉ लस्टच्या ट्वीटवर एका वापरकर्त्याने तिला गंमतीने विचारले की ही तिची पॉर्न क्लिप आहे का जी रेल्वे स्टेशनवर चालवली जात होती? ज्यावर तिने सांगितले की तिला आशा आहे की हा पॉर्न व्हिडीओ तिचाच असावा.
हे ही वाचा<< …म्हणून ब्रा-पॅंटी घालून पुरुष करतायत लाईव्ह जाहिरात; चीनच्या जिनपिंग सरकारचा निर्णय आहे तरी काय?
दरम्यान, प्रवाशांनी आपल्या फोनमध्ये ही घटना रेकॉर्ड करून सोशल मीडियावर तक्रार करताना व्हिडिओही शेअर करायला सुरुवात केली होती. सध्या दत्ता कम्युनिकेशन (स्क्रीन चालवणारी एजन्सी) आणि त्यांचे अज्ञात ऑपरेटर व कामगारांविरुद्ध रेल्वे कायद्याच्या कलम १४५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लाजीरवाण्या घटनेच्या संदर्भात आरपीएफ आणि जीआरपीने स्वतंत्र एफआयआर नोंदवले आहेत. त्याची चौकशी सुरू आहे, असे पूर्व मध्य रेल्वे झोनचे मुख्य जनसंपर्क अधिकारी वीरेंद्र कुमार यांनी सांगितले