देशभक्तीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. यातले काही व्हिडीओ खूप हटके असतात. असाच एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक म्हणत आहेत की देशावर प्रेम करणे खूप महत्वाचे आहे. देश सुरक्षित असेल तर आपणही सुरक्षित आहोत. हा व्हिडीओ तुम्हालाही नक्कीच आवडेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की काय आहे व्हिडीओमध्ये?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आकाशात ८००० फूट उंचीवर एक व्यक्ती आहे. त्याच्यासोबत आणखी एक व्यक्तीही आहे. ती व्यक्ती पॅराग्लायडिंगचा आनंद घेत आहे, त्याच्या हातात एक छोटी गिटारही आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ती व्यक्ती मधुर आवाजात ‘माँ तुझे सलाम’ हे गाणे गात आहे. या व्यक्तीचा आवाज इतका गोड आहे की ऐकणाऱ्याचे मन भरून येते.

(हे ही वाचा: या फोटोत लपलाय बिबट्या, तुम्ही शोधू शकता का?)

(हे ही वाचा: बॉईज हॉस्टेलमध्ये मुलांनी अनोख्या पद्धतीने केलं हनुमान चालिसाचे पठण; धमाल Video Viral)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ फेसबुकवर वन बीट नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ २ लाखांहून अधिक लोकांनी पहिला आहे, तर हजारो लोकांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. यावर एका युजरने कमेंट करताना लिहिले आहे “देशभक्तीची अशी भावना आम्ही कुठेही पाहिली नाही.” आणखी एका यूजरने लिहिले आहे “भारत माता की जय!”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patriotism the song maa tujhe salaam sung at an altitude of 8000 feet the video is going viral ttg