१३,००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची संस्था चालवणे सोपे नाही, त्यामुळे पेटीएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा हे बऱ्याचदा स्वत: दीर्घ कामाच्या बैठकांमध्ये उपस्थित राहतात यात आश्चर्यकारक नाही. परंतु अलीकडेच, त्यांनी एका जास्त वेळेच्या झूम कॉलबद्दल सांगितलं. एवढा वेळ म्हणजे एखाद्या सामान्याच्या कामाच्या दिवसाच्या संपूर्ण कालावधी आहे. जेवढा वेळ शर्मा कॉल वर होते तेवढ्या वेळात तुम्ही दिल्लीहून दुबई – आणि परत उड्डाण करू शकता.

किती वेळेचा होता कॉल?

“मी नुकताच माझा सर्वात लांब झूम कॉल पूर्ण केला,” त्यांनी सोमवारी ट्विटरवर लिहिले, कॉलचा कालावधी “७ तास ४५ मिनिटे” असल्याचे त्यांनी सांगितले.त्याच्या ट्विटला जवळजवळ ४ हजार लाईक्स आणि अनेक कमेंट्स आल्या आहेत.

नेटीझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया

बरेच ट्विटर वापरकर्ते प्रभावित झाले नाहीत – त्यांच्या अनुसार ते फोनवर त्यांच्या क्रशशी बोलण्यात १० तास घालवायचे.

इतने में तो ऑनलाइन क्लासेस सेमिस्टर के हो जाते सर” अशी कमेंट एका वापरकर्त्याने केली.

“ही तर झूम मॅरेथॉन” दुसऱ्या वापरकर्त्याने केमेंट केली.

काहींना मात्र याविषयी काहीच कौतुक वाटलं नाही.

तुमचं काय मत आहे याबद्दल?