नोटाबंदीचा निर्णय जाहिर झाल्यानंतर देशाला अच्छे दिन आले की नाही माहिती नाही पण पेटीएमला मात्र नक्कीच अच्छे दिन आलेत असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. या कंपनीने नुकतीच यशाबद्दल पार्टी दिली होती. या पार्टीमध्ये पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी एक भाषण दिले आणि या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : ‘लाईव्ह’ पासून फेसबुक दूर जाणार?

नोटाबंदीचा निर्णय जाहिर केल्यानंतर जुन्या पाचशे आणि हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्या. त्यानंतर मोदींनी देशापुढे रोकडविरहित व्यवहाराचा पर्याय ठेवला आणि नंतरच पेटीएमला सोन्याचे दिवस आले. नोटबंदीनंतर फक्त सहा दिवसांत पेटीएमद्वारे ३०० पटींने अधिक व्यवहार झाले. इतका फायदा पेटीएमला यापूर्वी कधीच झाला नव्हता. आपल्या या अनपेक्षित यशाचा आनंद साजरा करताना पेटीएमचे सीएओ एवढे उत्साहात होते की एखाद्या कॉलेजच्या तरुणाला देखील त्यांनी लाजवले असते. या सोहळ्यातील त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ‘जो आपल्यासोबत नसेल त्याच्यावर रडण्याची वेळ येईल, जे १० वर्षांत करणे शक्य नव्हते ते आपण एका वर्षात करून दाखवले.  २०१७ हे वर्ष पण पेटीएमचेच असेल’ असे शर्मा ओरडून ओरडून सांगत होते. एवढंच नाही तर आम्ही जो विचार केला त्या विचाराने स्पर्धकांची पँट ओली झाली नाही तर नवलचं असेही ते म्हणाले. हे सर्व भाषण देताना शर्मा यांनी शिवीगाळ देखील केली. शर्मा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक दिवसात लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

नोटाबंदीचा निर्णय जाहिर झाल्यानंतर पेटीएमला सुगीचे दिवस आले होते. या निर्णयानंतर सर्वधिक फायदा पेटीएमला झाला होता. रोकड विरहित व्यवहारांसाठी अनेकांनी पेटीएम अॅप डाऊनलोड केले आणि आपले सर्व आर्थिक व्यवहार याच अॅपच्या साह्याने केले होते याचा मोठा फायदा पेटीएमला झाला.