इंग्लिश येणं म्हणजे एकदम महत्त्वाचं आहे.शेवटी जगाची भाषा आहे ती, यायलाच पाहिजे. तोडकं मोडकं इंग्लिश येणं पुरेसं नाही. तर फाडफाड आलं पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बरं मग त्यासाठी काय करायचं?

मुलांना इंग्लिश मीडियममध्ये घालायचं. जरूर.

मग मातृभाषेचं काय?

ती येईलच.

असा साधारण आजकाल सगळ्यांचा सूर दिसतो आहे. इंग्लिश मीडियम काही वाईट नाही. आपल्या मुलांना कुठल्या माध्यमात घालायचं हा त्या त्या पालकांचा निर्णय असतो.

पण इंग्लिश मीडियममध्ये घातलं नाही तर मुलाला इंग्लिश येणारच नाही हा समज साफ चुकीचा आहे. अनेक उद्योगपती, नेते तसंच शिक्षणक्षेत्रातल्या आणि विज्ञानक्षेत्रातल्या अनेक व्यक्तींचं शिक्षण इंग्लिश माध्यमात झालं नव्हतं. तरीही त्यांनी आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठलं.

अशा व्यक्तींमधलीच सध्या चर्चेत असणारी एक व्यक्ती म्हणजे विजय शेखर शर्मा. नोटाबंदीनंतरच्या काळात सगळीकडे प्रसिध्द झालेल्या पेटीएम कंपनीचे ते सीईओ आहेत. ८ नोव्हेंबरला नोटाबंदी झाल्यानंतर चलनतुटवड्याच्या काळात आॅनलाईन पेमेंट सोल्युशन्स पुरवणाऱ्या पेटीएम कंपनीने या स्पर्धेत जबरदस्त बाजी मारली. एवढी की आॅनलाईन पेमेंटला ‘पेटीएम करा’ असं नाव पडलंय.
अलीगढसारख्या लहान शहरात शालेय शिक्षण झालेल्या विजय शेखर शर्मा यांना काॅलेजमधल्या पहिल्या काही वर्षांमध्ये इंग्लिशचा प्रचंड त्रास झाला.त्यांचं शिक्षण हिंदी माध्यमातून झालेलं असल्याने त्यांना माध्यमातला या बदलाला सांभाळून घ्यायला जड पडलं.

वाचा- नुकसानभरपाई म्हणून कोर्टाने एक्सप्रेसगाडी शेतकऱ्याच्या नावे केली!

“शाळेत मी पहिल्या बेंचवर बसणारा विद्यार्थी होतो” शर्मा यांनी ‘आज तक’ला प्रतिक्रिया दिली “पण काॅलेजमध्ये गेल्यावर मी इंग्लिशच्या भीतीने शेवटच्आ बेंचवर बसायला लागलो. कारण शिक्षकांना इंग्लिशमधून उत्तर देणं मला जमायचं नाही”
विजय शेखर शर्मा इंडिया टुडे काॅनक्लेव्हमध्ये आले होते.

इंग्लिश मीडियममध्ये न शिकल्याने सुरूवातीला त्रास होऊनही शर्मा यांनी या अडथळ्यावर मात केली. आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि आज ते 1 अब्ज डाॅलर किंमतीच्या कंपनीचे सीईओ आहेत.

वाचा- धन्यासाठी त्याने प्राणाची लावली बाजी

भाषा शिकण्यासाठी लागते ती मनाची तयारी. रणांगणात उतरतानाच आपण पराभूकत मानसिकतेने उतरलो तर कसं चालेल. म्हणूनच आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेताना इंग्लिशवरचं आपलं प्रभुत्त्व कमी होईल ही मानसिकताच आपण सोडली पाहिजे.