Bengaluru Man Rides Unicycle Through Traffic: बंगळूरूच्या रस्त्यांवर विचित्र दृश्ये पाहायला मिळतात, पण यावेळी आउटर रिंग रोड (ORR) वरील एका माणसाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, एक माणूस भररस्त्यात कसालाही संकोच न करता एका चाकी सायकल चालवताना दिसत आहे. होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये हेल्मेट आणि बॅक पाठीवर घेऊन एक माणूस एका चाकाच्या सायकलवर सहजतेने तोल सावरून जाताना दिसत आहे. रस्त्यावर भरधाव वेगाने धावणाऱ्या कार आणि बसेसमधन वाट काढत तो सहजतेने जात असल्याचे दिसून आले आहे.
“बेंगळुरू व्हिज्युअल्स” या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या या क्लिपने लवकरच लोकप्रियता मिळवली, ज्यामध्ये कॅप्शन असे होते की, “हे हे बेंगळुरूच्या भाविष्यातील प्रवास आहे कि फक्त एक धोकादायक स्टंट ?” व्हिडिओ पाहून थक्क झालेल्या नेटकऱ्यांनी समीश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काही जण त्याच्या संतुलन आणि आत्मविश्वासाने आश्चर्यचकित आहेत, तर काही जण बाहतूक कोंडीसाठी ओळखळल्या जाणाऱ्या बंगळुरूच्या रस्त्यावरून ही एक चाकी सायकल चालवणे धोकादायक असल्याचे सांगितले.
लक्षात ठेवा, बंगळुरूचा ओआउटर रिंग रोड हा प्रचंड रहदारी आणि कोंडीसाठी प्रसिद्ध आहे, जिथे दररोज विचित्र गोष्टी पाहायला मिळतात.
सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या कमेंट्सचा पूर आला. “बंगळुरू हे नवशिक्यांसाठी नाही,” असे एका वापरकर्त्याने लिहिले, तर दुसरा म्हणाला”भाऊ, तुम्ही बंगळुरूमध्ये आहात, अमेरिका आणि युरोपमध्ये नाही, खड्डा दिसत नाही. आणखी एकाने वापरकर्त्याने खिल्ली उडवली, ‘ये भारत २०२५ मध्ये राहत आहे, तर चीन २०५० पर्यंत पोहोचलेला नाही.’
यूनिसायकल चालवणे सुरक्षित आहे का?
ट्रॅफिकमधून यूनिसायकल चालवणे ही चांगली कल्पना वाटू शकते, परंतु ती धोकादायक आहे. ORR सारख्या रस्त्यावर अशा प्रकारे सायकल चालवणे केवळ स्वतःसाठीच नाही तर इतर चालकांसाठी देखील धोकादायक आहे.
अलिकडेच, बेंगळुरूमध्ये आणखी एक वाहतूक घटना व्हायरल झाली जेव्हा पथिक नावाच्या एका व्यक्तीने ओला आणि उबरवर बराच वेळ वाट पाहावी लागल्याने कामावर जाण्यासाठी पोर्टरवरून राईड बुक केली. त्याने एक्सवरील एका पोस्टमध्ये त्याचा अनुभव शेअर केला आणि तो व्हायरल झाला.